बार्शी – येथील सौ. सुमन शिवानंद चंद्रशेखर यांच्या ‘ऋत प्रकाशन’तर्फे प्रकाशित झालेल्या ‘मायेची पाखर’ या कादंबरीला निर्मला मठपती फाऊंडेशन, सोलापूर यांच्यावतीने सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे लेखिकेच्या साहित्यिक योगदानाचा सन्मान झाला असून साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद, सोलापूरच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा भाषा वाङ्मय संकुलाचे संचालक डॉ. महेश खरात उपस्थित होते.
Views: 20