सोलापूर – वसुबारसनिमित्त गोरज मुहूर्तावरती श्री कट्टेव्वादेवी गोशाळा वडकबाळ येथे गाय वासरूचे पूजन करून गोग्रास देण्यात आले. याप्रसंगी उमेदचे प्रभाग समन्वयक अतुल क्षीरसागर परिवारासह उपस्थित राहून स्वतःच्या हस्ते १०१ पशुधनांना गुळ भिजवलेले हरभरा दाळ, कापलेले बटाटे देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले . याप्रसंगी कृषी अधिकारी श्रीमर्ती कस्तुरे , डॉ. भारत शिंदे, स्वप्नताई लोभे व त्यांचे परिवार, अश्विनी बिराजदार, शिवानी मॅडम , दर्शन कोचर व त्यांचे परिवार, गोशाळेचे अध्यक्ष उमा बिराजदार, उपाध्यक्ष माधवी शिंदे, सचिव कविता राठोड, कॅनरा बँकचे गोरे सर, रावसाहेब राठोड , रुद्रप्पा बिराजदार, सिद्धप्पा धोंडाप्पा बिराजदार, आप्पाराव बिराजदार , आकाश बिराजदार, प्रमोद बिराजदार, महानंदा बिराजदार, राजश्री लिगाडे, राजमती बिराजदार, कस्तुरबाई बिराजदार, कुमार बिराजदार, श्रीशा बिराजदार आदी गोभक्त उपस्थित होते.
Views: 10