श्रीपूर – येथिल प्रवर्तन फाऊंडेशनच्या वतीने भारतीय सैन्यदलातील जवान विशेषतः जम्मू काश्मिर सीमेवर तैनात असलेल्या व देशाचे रक्षण करणाऱ्या जवानां साठी दरवर्षी दिपावली सणासाठी फराळ पाठवला जातो . यावर्षीही सुमारे २ हजार मिठाई बॉक्स वाटप करण्यात येणार असून मिठाई बॉक्स घेवून जाणार्या गाडीचे पुजन माळशिरस तालुक्याचे माजी आ. रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी माजी आ. रामभाऊ सातपुते यांनी प्रवर्तन फाऊंडेशनच्या मानवतेच्या उपक्रमाचे कौतुक केले तर निनाद पटवर्धन यांनी आम्ही गेल्या अनेक वर्षा पासून कश्मिर मध्ये सामाजीक उपक्रम राबवित आहोत यामध्ये तेथिल विद्यार्थ्यामध्ये विविध स्पर्धा , महिलांसाठी उद्योग मार्गदर्शन शिबीरे , बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण असे उपक्रम राबवित आहेत . अर्थात महाराष्ट्रा मधून जावून तेथे काम करणे आर्थिक दृष्ट्या कसरतीचे आहे . परंतू पुण्याच्या खा . प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी, माजी आमदार रामभाऊ सातपुते, करमाळ्याच्या रश्मीताई बागल, प्रवर्तन फाउंडेशनचे संचालक सचिन शिंदे (अकलुज ) गणेशकाका जगताप, चंद्रशेखर मोकाशी ( श्रीपूर ) गिरीश डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनची सामाजिक वाटचाल सुरूअसत्याचे सांगितले .
यंदा जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मच्छल सेक्टर तसेच उरी सेक्टर या सीमावर्ती भागांमध्ये जाऊन जवानांसोबत फराळाचे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमात मोहन कवडे, विशाल सदगर, रोहित गोडबोले व सुजित जाधव हे सहभागी झाले आहेत.या उपक्रमातून
केवळ दिवाळी साजरी करण्यापुरतेच फाउंडेशनचे कार्य मर्यादित नसून कश्मिर हा प्रांत भारताचा अविभाज्य घटक आहे, ही राष्ट्रीय एकात्मतेची भावना तेथील नागरिकांच्या मनात अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रवर्तन फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या निमित्ताने आनंद फुलविण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रवर्तन फाउंडेशनचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व भारतवासीयांना प्रवर्तन फाउंडेशनच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
Views: 11