करकंब – करकंब ता.पंढरपूर येथील मटकी,हरभरे विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सुमन गावडे या ७५ वर्षीय वयोवृद्ध,निराधार आज्जीस लिंगायत हटगर कोष्टी समाजाच्या आमची गुणी मुले प्रतिष्ठानच्या वतीने ३ महिने पुरेल एव्हढे किराणा साहित्य देण्यात आले.लिंगायत हटगर कोष्टी समाजातील गुणवंत विद्यार्थी व गरजूंना मदत व्हावी या उद्देशाने डॉ.अशोक शिनगारे जालना यांच्या संकल्पनेतून हा ग्रुप पाच वर्षापासून कार्यरत आहे.या ग्रुपतर्फे लिंगायत हटकर कोष्टी समाज बांधवांकडून निधी संकलित करून समाजातील गुणवंत विद्यार्थी,गरजू,शुभकार्य, स्मृतिप्रीत्यर्थ,आर्थिक दुर्बल घटक,निराधार,अपंग व्यक्तींसाठी खर्च केला जातो.आर्थिक परिस्थितीमुळे दिपावली साजरी करू शकत नाहीत त्यांना ३महिन्यांचे किराणा साहित्य देण्यात येते.त्या अनुषंगाने करकंब येथील शैलजा मुखरे,मा.पं.स.सदस्य विद्या वास्ते,मनिषा नरखेडकर,बंडू वास्ते,धोंडीराम भाजीभाकरे,सोमनाथ नरखेडकर यांच्या हस्ते हे साहित्य देण्यात आले.यावेळी धोंडीराम भाजीभाकरे यांनी ५०१ रुपये दिलें.
Views: 14