पंढरपूर – दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त नरक चतुर्दशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची व आकर्षक पानांची मनमोहक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी सुमारे दीड टन फुलांचा वापर करण्यात आला असून, मंदिर परिसराला आकर्षक व प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले आहे.
या फुलांच्या सजावटीसाठी लाल गोंडा, पिवळा गोंडा, शेवंती, अॅस्टर, गुलछडी, गुलाब, ऑर्किड, क्रिसॅन्थिमम, पिंक डेझी, डेझी, कामिनी, पिवळी शेवंती तसेच विविध प्रकारच्या देशी-विदेशी फुलांचा आणि मनी प्लांटसारख्या शोभिवंत पानांचा वापर करण्यात आला आहे.
विविध रंगसंगती, फुलांची आकर्षक मांडणी आणि कलात्मक सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. सदर फुलांची सजावट सेवा बीड येथील भाविक अर्जुन पिंगळे यांच्या मार्फत देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आली आहे.
Views: 15