सोलापूर: जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मधील खेळाडूं नी तायक्वांदो व ज्युडो स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 रौप्य तर 1 कास्य पदक प्राप्त केले आहे.
. महाराष्ट्र राज्य क्रीडा सेवा संचलनालय पुणे ,अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर ,तसेच जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर ,व सोलापूर महानगरपालिका सोलापूर आणि सोलापूर जिल्हा तायक्वांदो व जुडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी इनडोअर स्टेडियम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या 14 व 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो व ज्युडो स्पर्धेत शाळेतील खेळाडू कुमार आर्यन वाघमोडे याने सुवर्ण पदक, तर कुमारी ईश्वरी कदम हिने रौप्य पदक आणि कुमार सार्थक जाधव याने 17 वर्षाखालील मुलांच्या तायक्वांदो स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केले आहे.
सदर खेळाडूना शाळेतील क्रीडा शिक्षक श्री अतुल सोनके यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
सदर यशस्वी खेळाडूचे संस्थाध्यक्ष डॉक्टर माननीय श्री. सूर्यप्रकाश कोठे, उपाध्यक्ष माननीय आमदार श्री.देवेंद्र दादा कोठे,सचिव माननीय श्री. प्रथमेश दादा कोठे, डॉक्टर सौ. राधिकाताई चिलका, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी सुरा व सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
Views: 15