सोलापूर – केडर मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. या मतदारसंघासाठी तब्बल १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत असल्याची माहिती उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली.
यामध्ये दिलीप माने यांचे दोन अर्ज, सुरेश हसापुरे, श्रीदीप हसापुरे, धैर्यसिंह मोहिते-पाटील, सुरेश पाटील, संग्रामसिंह जहागिरदार, नानासाहेब नाईकनवरे, नागनाथ रनशूर, देविदास ढोपे आणि धनाजी शिंगाडे यांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर काही हालचाली होण्याची शक्यता असली, तरी विविध मतदारसंघांतील उमेदवारांची संख्या आणि राजकीय नेत्यांची भूमिका पाहता बिनविरोध निवडणुकीचा मार्ग सोपा नसल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच प्रत्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, कोणत्या मतदारसंघात थेट लढत होणार आणि कुठे राजकीय तडजोडी होणार, याचा निर्णय त्यावेळेसच होईल.


















