Monday, November 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासाठी संजयमामा शिंदे ॲक्शन मोडवर!

तरुण भारतbyतरुण भारत
November 16, 2026
in west maharashtra
0
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासाठी संजयमामा शिंदे ॲक्शन मोडवर!
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
जेऊर –  दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांनी आक्रमकपणे पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भेट घेऊन दहिगाव उपसा सिंचन योजनेचे २०२६-२७ मधील मंजूर ०.५७ टीएमसी पाणी कायम ठेवून १५ डिसेंबरऐवजी १५ नोव्हेंबर २०२६ पासून सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली आहे.
उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातील एकूण ३७.३९ टीएमसी पाण्याच्या वितरणाचे नियोजन करण्यात आले असून, त्यामध्ये दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी १५ डिसेंबर २०२६ ते १० फेब्रुवारी २०२७ या कालावधीत ०.५७ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. मात्र, दहिगाव उपसा सिंचन योजना दोन टप्प्यांत कार्यरत असून, उजनी धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर जुने पंप असल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी होतो. पुढील काळात धरणातील पाणीसाठा उणे पातळीकडे जाण्याची शक्यता लक्षात घेता मंजूर पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आवर्तनाची तारीख बदलणे आवश्यक असल्याचे संजयमामा शिंदे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, घोटी, निंभोरे, फिसरे, सरपडोह, पांडे, शेलगाव (क) आदी गावांमध्ये सध्या टँकरद्वारे केवळ मनुष्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जात आहे. आता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा परिस्थितीत १५ नोव्हेंबरपासून आवर्तन सुरू झाल्यास संबंधित गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
मंजूर  आवर्तनाच्या तारखेत बदल करून १५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात यावे, अशी भूमिका संजयमामा शिंदे यांनी मांडली आहे. योजनेच्या तांत्रिक बाबींची तातडीने तपासणी करून कालवा सल्लागार समितीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नासाठी संजयमामा शिंदे यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतल्याने आता शासन आणि प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण लाभक्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Views: 13
Previous Post

मंद्रूप चॅलेंजर क्रिकेट क्लबने पटकावला ‘पोलीस जनता चषक’!

Next Post

शाहीर अमर शेख साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शाहीर अमर शेख साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न

शाहीर अमर शेख साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026

मध्यरात्री किराणा दुकान फोडले; रोख रक्कमेसह ९ हजारांचा किराणा माल लंपास

November 16, 2026
वीर धरणातुन निरा डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये समाधान रब्बी हंगामाच्या थोड्याफार आशा पल्लवित

वीर धरणातुन निरा डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये समाधान रब्बी हंगामाच्या थोड्याफार आशा पल्लवित

November 16, 2026

1 ते 10 नोव्हेंबर दरम्यानचे रू.3150/-प्रमाणे बील शेतक-यांच्या खात्यात जमा

November 16, 2026
बार्शीच्या विकासासाठी प्रयत्नशील -आ. राजेंद्र राऊत

बार्शीच्या विकासासाठी प्रयत्नशील -आ. राजेंद्र राऊत

November 16, 2026
कृषी साहीत्य खरेदीसाठी प्रस्ताव सादर करा_ उपसभापती मनीषा पाटील

कृषी साहीत्य खरेदीसाठी प्रस्ताव सादर करा_ उपसभापती मनीषा पाटील

November 16, 2026
क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी ग्रुपच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर 

क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी ग्रुपच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर 

November 16, 2026
शाहीर अमर शेख साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न

शाहीर अमर शेख साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न

November 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1521135

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!