सोलापूर – पंढरपूर येथे २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकी एकादशीनिमित्त प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेद्वारे विशेष गाड्यांच्या ३६ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
यामध्ये गाडी क्र. ०१४०५ मिरज-लातूर अनारक्षित विशेष गाडी, १७.११.२०२६ ते २३.११.२०२६ या कालावधीत दररोज मिरजवरून सकाळी ०७:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ०२:३५ वाजता लातूरला पोहोचेल. (७ फेऱ्या) पंढरपूरला सकाळी १०:१५ वाजता आगमन होईल तर प्रस्थान सकाळी १०:२० वाजता होईल. गाडी क्र. ०१४०६ लातूर-मिरज अनारक्षित विशेष गाडी, १७.११.२०२६ ते २३.११.२०२६ या कालावधीत दररोज लातूरवरून दुपारी ०३:५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११:४५ वाजता मिरजला पोहोचेल. (७ फेऱ्या) पंढरपूरला रात्री ०७:४५ वाजता आगमन होईल तर प्रस्थान रात्री ०७:५० वाजता होईल.
गाडी क्र. ०१४०७ मिरज-लातूर अनारक्षित विशेष गाडी, १९.११.२०२६ ते २२.११.२०२६ या कालावधीत दररोज मिरजवरून रात्री १०:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:३० वाजता लातूरला पोहोचेल. (४ फेऱ्या) पंढरपूरला रात्री ११:५० वाजता आगमन होईल तर प्रस्थान ११:५५ वाजता होईल. गाडी क्र. ०१४०८ लातूर-मिरज अनारक्षित विशेष गाडी १९.११.२०२६ ते २२.११.२०२६ या कालावधीत दररोज लातूरवरून सकाळी ०६:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ०१:५० वाजता मिरजला पोहोचेल. (४ फेऱ्या) पंढरपूरला सकाळी १०:०५ वाजता आगमन होईल तर प्रस्थान सकाळी १०:१० वाजता होईल.
अरग, सलगरे, कवठे महांकाळ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुर्डुवाडी, शेंद्री, बार्शी टाऊन, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब रोड, ढोकी, मुरुड, औसा रोड आणि हरंगुळ असे या गाड्यांना थांबे असतील तर १६ जनरल सेकंड क्लास/स्लीपर क्लास डबे आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन एकूण १८ अनारक्षित डबे अशी रचना असेल .
सोलापूर-मिरज अनारक्षित गाड्यांमध्ये गाडी क्र. ०१४१९ सोलापूर-मिरज अनारक्षित विशेष गाडी १७.११.२०२६ ते २३.११.२०२६ या कालावधीत दररोज सोलापूरवरून सकाळी ०७:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:२० वाजता मिरजला पोहोचेल. (७ फेऱ्या) पंढरपूरला सकाळी ०९:५० वाजता आगमन होईल तर प्रस्थान सकाळी ०९:५५ वाजता होईल. गाडी क्र. ०१४२० मिरज-सोलापूर अनारक्षित विशेष गाडी १७.११.२०२६ ते २३.११.२०२६ या कालावधीत दररोज मिरजवरून दुपारी ०१:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ०७:१० वाजता सोलापूरला पोहोचेल. (७ फेऱ्या) पंढरपूरला दुपारी ०२:५० वाजता आगमन होईल तर प्रस्थान दुपारी ०२:५३ वाजता होईल.
मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, साळगरे आणि आरग असे या गाडीचे थांबे असतील तर १६ जनरल सेकंड क्लास/स्लीपर क्लास डबे आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असे एकूण १८ अनारक्षित डबे अशी रचना असेल.



















