अक्कलकोट – सर्व स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान व श्री स्वामी समर्थाचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शन व्यवस्थेतील नियोजन कौतुकास्पद असल्याचे मनोगत अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशैल गवंडी यांनी खासदार नीलेश लंके यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, पुष्पहार, पुष्पगुच्छ व प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी खासदार नीलेश लंके बोलत होते.
पुढे बोलताना खासदार नीलेश लंके म्हणाले की भाविकांसाठी असलेल्या सुविधा, दर्शन रांगेचे नियोजन, आरती साठी आसन व्यवस्था ही सर्व सेवा चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या अधिपत्याखाली अखंडपणे चालत असल्याचे पाहून धन्य झालो आहे.
हे देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुलभ, शांत आणि समाधानकारक दर्शन व्हावे, यासाठी देवस्थान समितीने केलेले नियोजन खरोखरच कौतुकास्पद आहे. चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान व्यवस्थापनाने दर्शन रांग, स्वच्छता, पाणी यामध्ये खूप चांगली सुधारणा केली आहे. वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी विशेष काळजी घेतली जात आहे, हे पाहून मनाला खूप आनंद झाला. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अक्कलकोटचा विकास व्हावा, भाविकांची संख्या वाढावी आणि इथली व्यवस्था अशीच आदर्श राहावी, हीच स्वामी चरणी प्रार्थना करतो. देवस्थानच्या पुढील विकास कामांसाठी माझे नेहमीच सहकार्य राहील असेही मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यंकटेश पुजारी, रुद्रय्या स्वामी, श्रीकांत मलवे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, विपुल जाधव आदींसह स्वामी भक्त व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Views: 12