Friday, November 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगरपरिषदेची सर्व यंत्रणा सज्ज

तरुण भारतbyतरुण भारत
November 20, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – कार्तिकी यात्रा २०२६ च्या अनुषंगाने पंढरपूर येथे येणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत शहरासह चंद्रभागा नदीपात्र, वाळवंट, ६५ एकर भक्तिसागर आणि पत्राशेड परिसरात स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालये, प्रकाशव्यवस्था तसेच आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली  असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
स्वच्छता व्यवस्थेसाठी १ हजार ५० कर्मचारी नियुक्त
यात्रा कालावधीत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेचे ३५० कायमस्वरूपी व ७०० ठेक्यावरील असे एकूण १ हजार ५० कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. दररोज निर्माण होणाऱ्या १२० ते १५० टन कचऱ्याचे संकलन व वाहतूक करण्यासाठी ४१ घंटागाड्या, ६ कचरा वाहने, टिपर व ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. ही यंत्रणा दोन सत्रांत कार्यरत राहणार आहे. सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसाठी तीन पाळ्यांमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सक्शन व्हॅक्युम मशिन्स, जेटिंग मशिन्स व कल्चर फवारणी यंत्रणाही उपलब्ध करण्यात आली आहे.
भाविकांच्या सुविधेसाठी शहरात सुलभ शौचालयांची २ हजार ६२ आसने, नगरपरिषदेची ८४ आसने, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत १३६ आसने आणि रेल्वे विभागाची १५ आसने उपलब्ध आहेत. याशिवाय ७० सार्वजनिक मुतारींची व्यवस्था करण्यात आली आहे. ६५ एकर परिसरात १ हजार ३८० कायमस्वरूपी शौचालये असून नदीपात्र, पत्राशेड व ६५ एकर परिसरात तात्पुरती प्री-फॅब्रिकेटेड शौचालये उभारण्यात आली आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी २४ तास व्यवस्था
६५ एकर परिसरातील १५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीतून २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पिण्याचे व वापराचे पाणी उपलब्ध होण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी पाण्याचे टँकर राखीव ठेवण्यात येणार आहेत.
आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र केंद्रे
यात्रेदरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा तत्काळ सामना करण्यासाठी ६५ एकर, चंद्रभागा नदीपात्र वाळवंट, पत्राशेड, तुकाराम भवन आणि नगरपरिषद कार्यालय येथे आपत्कालीन व्यवस्थापन केंद्रे (EOC) स्थापन करण्यात आली आहेत.
अग्निशमन व्यवस्थेसाठी नगरपरिषदेची तीन अग्निशमन वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. याशिवाय सोलापूर महानगरपालिका तसेच बार्शी, करमाळा, मंगळवेढा, कुर्डुवाडी व सांगोला नगरपरिषदांची अग्निशमन वाहनेही उपलब्ध करून घेण्यात आली आहेत. चंद्रभागा नदीपात्रात यांत्रिकी रबर बोटींसह प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
प्रकाशव्यवस्था व अतिक्रमण निर्मूलनावर विशेष लक्ष
यात्रा कालावधीत शहरातील पथदिवे सुरळीत सुरू राहावेत, यासाठी देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गर्दीच्या प्रमुख ठिकाणी अतिरिक्त प्रकाशव्यवस्था व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदांमधील अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांच्या सहकार्याने शहरातील अतिक्रमण निर्मूलन, चंद्रभागा वाळवंट व ६५ एकर परिसरातील स्वच्छता आदी कामे करण्यात येत आहेत.
कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी वातावरणात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून विविध विभागांच्या समन्वयाने कार्यवाही करण्यात येत आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी भाविक व नागरिकांनी स्वच्छता राखून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. असेही मुख्याधिकारी श्री. रोकडे यांनी सांगितले.
Views: 11
Previous Post

ज्वारी संशोधन केंद्राच्या शेतातील विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

Next Post

माढ्यात उसाचे ट्रॅक्टर आडवले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

माढ्यात उसाचे ट्रॅक्टर आडवले

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या परतीच्या प्रवासात हेलिकाँप्टर मध्ये बिघाड, कार मधून पुण्याकडे रवाना

November 20, 2026

सोलापूर शहरात मनाई आदेश लागू

November 20, 2026
सांगोला महाविद्यालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

सांगोला महाविद्यालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026

ई-बसच्या वाहक पदांवर महिलांना ५० टक्के प्राधान्य द्या

November 20, 2026
शायना एन.सी यांचा सांगोल्यात निषेध

शायना एन.सी यांचा सांगोल्यात निषेध

November 20, 2026

माढा न्यायालयातील कामकाज दुसऱ्या दिवसीही ठप्प

November 20, 2026
आदिनाथ कारखाना-भाळवणी-केम रस्त्याची दुरावस्था

आदिनाथ कारखाना-भाळवणी-केम रस्त्याची दुरावस्था

November 20, 2026

माढ्यात उसाचे ट्रॅक्टर आडवले

November 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1538768

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!