बार्शी – बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे भरदिवसा दुचाकी चोरीची घटना घडली आहे. घराबाहेर उघड्या ठिकाणी उभी केलेली दुचाकी हेरुन अज्ञात चोरट्याने तिचे हँडल लॉक तोडून सुमारे ४५ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चोरुन नेली. या घटनेमुळे परिसरात दुचाकी चोरट्यांचा वावर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
याबाबत मिळालेल्या पोलीस माहितीनुसार, तानाजी शिवा पवार (वय २३, रा. जभवाडे वस्ती, लक्ष्याचीवाडी, ता. बार्शी) यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आगळगाव येथे त्यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल उभी होती. यावेळी अज्ञात चोरट्याने संधी साधून मोटारसायकलचे हँडल लॉक तोडले आणि फिर्यादीच्या संमतीशिवाय ती चोरुन नेली. चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा क्रमांक MH 13 FB 0323 असून तिची अंदाजे किंमत ४५ हजार रुपये आहे. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी स.पो.नि. सोनवणे यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या दुचाकी चोरीच्या घटनेचा तपास करुन चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्याचे आव्हान आता बार्शी तालुका पोलिसांसमोर आहे.
Views: 25