सोलापूर : श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्था, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याच्या अनुषंगाने श्री पद्मावती देवीचा ‘पुट्टींटी पट्टुचिरा लग्नम चिट्टी’ हा पारंपरिक धार्मिक कार्यक्रम डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या मुरारजी पेठ येथील निवासस्थानी मंगलमय व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
यावेळी पारंपरिक धार्मिक विधी व श्रद्धापूर्वक कार्यक्रम पार पडला. श्री पद्मावती देवीच्या कृपेने आगामी ब्रह्मोत्सव सोहळा निर्विघ्नपणे व उत्साहात संपन्न व्हावा, तसेच सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या कोअर कमिटी सदस्यांनी व उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सहभाग नोंदविला. सदर वस्त्र अध्यक्ष अंबाना बिंगी यांच्या निवासस्थानी मिरवणुकीने आणण्यात आले.
या कार्यक्रमाचे नेतृत्व पंडित वेणुगोपाल जिल्ला पंतुलू
श्रीनिवास जिल्ला पंतुलू ,राहुल गौडा, कबीर गुर्राम यांनी केले.

























