सांगोला – फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ संघ, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे व विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ऍड.व्ही.बी.बाबर, प्राचार्य सिकंदर पाटील, ऍड.आर.आर.केदार-दळवी, ऍड.ए.एस.पटेल, ऍड. व्ही.एस. गायकवाड, ऍड.एम.एम.पतकी उपस्थित होते. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना समाजात वाढत चाललेले गुन्हेगारी, सायबर गुन्हे, पोक्सो कायदा, बालगुन्हेगारी तसेच व्यसनाधीनता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती करून घेऊन सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या नरुटे, आभार प्रदर्शन ऍड.एस.डी.मेनकुदळे यांनी केले.
Views: 12