करकंब – विद्या विकास मंदिर व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कनिष्ठ महाविद्यालय उंबरे (पागे) येथील शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा खुळपे यांना सामाजिक,शैक्षणिक,औद्योगिक,कला,क्रीडा,वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रात गेली दहा वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या श्री.साई समर्थ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविले जाते.त्या अनुषंगाने कृष्णा खुळपे यांना आदर्श शिक्षण सेवा गौरव पुरस्कार लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर येथे देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी विद्या विकास मंदिर व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कृष्णा खुळपे यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव ढोबळे,चेअरमन राजाराम नरसाळे,सचिव बलभीम पाटील,मुख्याध्यापक शहाजी पाटील,शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात करण्यात आले.
Views: 11