मंगळवेढा – तालुक्यातील शेलेवाडी येथील ३० वर्षीय गणेश मारुती चव्हाण याने आपल्या राहत्या घराजवळील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
साधू मारुती चव्हाण (वय ३२, रा. शेलेवाडी) यांनी दिलेल्या खबरीनुसार, त्यांचा लहान भाऊ गणेश मारुती चव्हाण (वय ३०, व्यवसाय शेती, रा. शेलेवाडी) याने दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजता ते २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता या कालावधीत आपल्या घराजवळील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.
मृतदेह शेलेवाडी येथील खबरदाराच्या घराच्या बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आढळून आला. घटनास्थळ शेलेवाडीपासून पश्चिमेस सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गणेश चव्हाण याला मागील दोन वर्षांपासून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच त्याने फायनान्स तसेच बचत गटाकडून कर्ज घेतले होते; यामुळे तो आर्थिक ताणामुळे मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृत्यूचे प्रकृत आणि निश्चित कारण पोस्टमॉर्टम अहवालातून निश्चित होणार आहे.
घटनेची खबर मिळताच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोहे कॉन्स्टेबल बाबर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. BNSS कलम १९४ नुसार अशा आत्महत्येच्या घटनांची चौकशी करून मृत्यूचे प्रकृत व दिसणारे कारण अहवालात नमूद करणे आवश्यक असते.
Views: 12