बार्शी – पाण्याचे महत्त्व अधोरेखित करुन भूजलपातळी वाढविण्यासह जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी श्री शिवाजी विद्यालय, कारी येथील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवार २२ नोव्हेंबर रोजी जलतारा प्रकल्पांतर्गत विद्यालयाच्यावतीने कारी गावातून जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’,
‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’, ‘थेंब थेंब पाण्याचा, उपयोग जीवनाचा’ अशा घोषणांनी कारी गावाचा परिसर दुमदुमून गेला. मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी विद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रम झाला आहे. जलतारा प्रकल्पाचे जनक डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांचे मार्गदर्शन व प्रकल्पाचे प्रात्यक्षिक यावेळी आयोजित करण्यात आले. मुख्याध्यापक महंमद शेख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Views: 10