सोलापूर : चित्रस्पर्श कलाविहार व संजीवनी आर्ट क्राफ्ट गॅलरी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय किल्ला व घरकुल बांधणी स्पर्धा २०२६ चा पारितोषिक वितरण सोहळा *बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर* येथे आयोजित करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, तसेच बालकलाकारांच्या कल्पकतेला व कलागुणांना प्रोत्साहन देणे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
*या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर डॉ. शिवरत्न शेटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता पाटील, इतिहास अभ्यासक प्रा.अमृत साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.*
*कार्यक्रमास , नगरसेवक व सीए श्री. विनोद भोसले, युवा उद्योजक श्री. सिद्धाराम डोमनाळे, चित्रकार श्री. ऋत्विज चव्हाण, डॉ. रोहित गणोचारी,श्री. प्रशांत गायकवाड, श्री. समर्थ बाकळे व श्री. सुरज मलजी, श्री. बाबूराव बुऱ्हाणपुरे , श्री. विजय बाहेती आणि श्री. अतिश वाघमारे (मेजर) यांची प्रमुख उपस्थिती नियोजित होती.*
या कार्यक्रमात सातारा येथील प्रा. अमृत साळुंखे यांचे गड-किल्ल्यांविषयी विशेष मार्गदर्शन, तसेच स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त संघांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्याचे नियोजन करण्यात आले. स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी कोल्हापूर येथील श्री. अनिकेत कांबळे यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
*किल्ला स्पर्धा विजेते*
1) भक्ती सोलापूरे, निम्बर्गी
2) साई अडसुळे
3) सिध्दरामा सुतार , निम्बर्गी
4) आयुष आळगी, मेघराज पाटील, यश माळगे , शेळगी
5) आयुष्य राऊत व तनय राऊत
*घरकुल स्पर्धा विजेते*
1) वैष्णवी चन्ना
2) मिनाक्षी कोटा व सौंदर्य कोटा
3) मोक्षदा दुदाम
4) हरिका दासरी
5) अधिरा व प्रीती जितुरे
*या उपक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार तथा चित्रस्पर्श कलाविहारचे संचालक डॉ. सचिन खरात आणि संजीवनी आर्ट क्राफ्ट गॅलरीचे श्री. चेतन बुऱ्हाणपूरे यांनी केले.* कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाची जबाबदारी डॉ. सचिन खरात, सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. रवींद्र देशमुख, तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी श्री. चेतन बुऱ्हाणपूरे यांच्याकडे होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुजल बोरामणी, रितेश पारसवार, बाबू वाघमारे, गायत्री यांनी परिश्रम घेतले.
Views: 12