Friday, November 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणुकीत ८६.९४ टक्के मतदान

तरुण भारतbyतरुण भारत
November 27, 2026
in soalpur
0
जिल्हा बँक निवडणुकीत ८६.९४ टक्के मतदान
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :जिल्हा बँक निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाच्या आकडेवारीनुसार एकूण ८६.९४ टक्के मतदान झाले. ११ तालुक्यांमध्ये उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर २ हजार ५९६ मतदारांपैकी २ हजार २५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी सांगितले.

डीसीसी बँकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांच्या मतदानाच्या आकडेवारीत अक्कलकोट तालुक्याने शंभर टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुका मतदानाच्या टक्केवारीत आघाडीवर राहिला आहे. यामध्ये सांगोला ९६.८३ टक्के, बार्शी ९६.२६ टक्के, माळशिरस ९५.६४ टक्के, मंगळवेढा ९३.४४ टक्के, मोहोळ ९०.६९ टक्के, दक्षिण सोलापूरमध्ये ९०.०४ टक्के, पंढरपूरमध्ये ८८.०३ टक्के मतदान झाले आहे. तर माढा तालुक्यात ७३.४६ टक्के आणि उत्तर सोलापूरमध्ये ७२.२५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

या निवडणुकीत अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माळशिरस, माढा, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या ११ तालुक्यांतील मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सांगोला आणि बार्शी तालुक्यांतही मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे माढा, पंढरपूर, माळशिरससह अन्य तालुक्यांमध्येही मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली.

डीसीसी बँकेच्या निवडणुकीत नऊ संचालक निवडले जाणार असल्याने या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा सुरू झाली आहे.

चौकट
इतके झाले मतदान
एकूण मतदार : २,५९६
प्रत्यक्ष मतदान : २,२५७
मतदानाची टक्केवारी : ८६.९४%
मतदान न केलेले : ३३९
तालुका निहाय मतदान केंद्रे : ११

चौकट
‘दोन्ही पार्ट्या आमच्याच!’ आ. देशमुखांच्या वाक्याने मतदान केंद्रावर चर्चा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोण कोणाच्या बाजूने आणि विरोधात, याची चर्चा रंगलेली असतानाच आ. विजय देशमुख यांनी आपल्या एका विधानाने राजकीय वातावरणात रंगत आणली. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘दोन्ही पार्ट्या आमच्याच!’ अशी टिप्पणी केली. त्यांच्या या विधानाची मतदान केंद्रावर चांगलीच चर्चा रंगली.

चौकट
मतपत्रिकेवर बाहेरून शिक्के मारून आणले ?

सांगोला येथे डीसीसी बँक निवडणुकीदरम्यान मतपत्रिकेवर बाहेरून शिक्के मारून आणले जात असल्याचा आरोप खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला होता. याची पूर्ण माहिती घेऊन सीसीटीव्ही तपासल्याअंती अशी कोणतीही घटना प्रथम दर्शनी निदर्शनास आढळून आली नसल्याचे उपनिबंधक मुकुंद पवार यांनी सांगितले.

चौकट
आपली क्षमता पाहून जागा मागितल्या असत्या तर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रत्येकाने आपली क्षमता लक्षात घेऊन जागांची मागणी केली असती, तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती,
– आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.

चौकट
दिलीप माने यांचे शक्तिप्रदर्शन

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी बँक) निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून, मतदानाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत मतदान केंद्राकडे रवाना होण्यापूर्वी फोटोसेशन केले. त्यांच्या या उपस्थितीमुळे निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिक रंगतदार झाले.

चौकट
अमोल शिंदे व मनीष देशमुख यांनी मारल्या एकमेकांशी गप्पा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपचे मनीष देशमुख आणि शिवसेनेचे अमोल शिंदे यांच्या लढतीकडे. सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतदान केंद्रावर अमोल शिंदे, मनीष देशमुख, चेतन नरोटे, तडवळकर, देवकर  दिलीप पतंगे, श्रीशैल बनशेट्टी या सर्वच नेत्यांनी एकत्रित येऊन एकमेकांशी मनमोकळे पणाने गप्पा मारल्या.

Views: 14
Previous Post

रेल्वे विभागात संविधान दिननिमित्त राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

Next Post

डीसीसी बँक निवडणूकीसाठी  मंगळवेढा केंद्रावर ९३ टक्के मतदान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

डीसीसी बँक निवडणूकीसाठी  मंगळवेढा केंद्रावर ९३ टक्के मतदान

ताज्या बातम्या

माळशिरस पोलिस ठाण्यात १००  रक्तदात्यांनी केलेरक्तदान

November 27, 2026

ऊसदराच्या प्रस्तावावर कारखानदारांची नाराजी; शेतकऱ्यांत असंतोष ३,४५० रुपयांच्या दराला अद्याप सर्व कारखान्यांची संमती नाही

November 27, 2026
मन-शरीराच्या योग्य समन्वयाने ऊर्जा व्यवस्थापन प्रभावी होते

मन-शरीराच्या योग्य समन्वयाने ऊर्जा व्यवस्थापन प्रभावी होते

November 27, 2026
महांकाळेश्वर केसरीचा मानकरी पुण्याचा रामा कांबळे

महांकाळेश्वर केसरीचा मानकरी पुण्याचा रामा कांबळे

November 27, 2026
अकलूज पोलीस स्टेशन व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने संविधान दिन व शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अकलूज पोलीस स्टेशन व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने संविधान दिन व शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

November 27, 2026
भांबेवाडी येथे लोकमंगल कृषिदूतांकडून शेतकरी आर्थिक सक्षमीकरणासाठी बँक कर्ज प्रस्ताव प्रात्यक्षिक

भांबेवाडी येथे लोकमंगल कृषिदूतांकडून शेतकरी आर्थिक सक्षमीकरणासाठी बँक कर्ज प्रस्ताव प्रात्यक्षिक

November 27, 2026

पालकमंत्री घेणार दुष्काळ आणि पाणीटंचाईचा आढावा 

November 27, 2026
अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा परिषदेमध्ये तात्काळ समायोजन करा  – शिक्षक भारती संघटनेचे आंदोलन 

अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा परिषदेमध्ये तात्काळ समायोजन करा  – शिक्षक भारती संघटनेचे आंदोलन 

November 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1570935

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!