मोडनिंब – २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मरणार्थ मंगलमूर्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मोडनिंब यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ४६ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अनेक नागरिक, युवक व रक्तदात्यांनी सहभाग घेतला. एका रक्ताच्या थेंबातून गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते, ही जाणीव ठेवत ४६ रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले.या शिबिरात सोलापूर ब्लड सेंटर यांच्या पथकाने रक्त संकलन केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला मंगलमूर्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.शहीद जवानांच्या स्मृती जपताना समाजासाठी उपयोगी ठरणारा रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात आला असून, रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मानवतेचा संदेश दिला, असे संस्थेचे अध्यक्ष दीपक सुर्वे यांनी रक्तदान शिबिराला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले.या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Views: 10