सोलापूर – जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या शालेय शहर मुलांच्या धनुर्विद्या स्पर्धेत 17 वर्षाखालील कंपाउंड राउंड या प्रकारात मुलाच्या गटात स्वराज केत व 14 वर्षाखालील इंडियन राऊंड या प्रकारात सर्वज्ञ चिंचोळीकर यानी चौथा क्रमांक पटकाविला. या कामगिरीवर त्यांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना क्रीडा शिक्षक अक्षय माने यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे संस्थापक अध्यक्ष ए.डी.जोशी, सचिव अमोल जोशी, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी, मुख्याध्यापिका सुजाता बुट्टे व ममता बसवंती यांनी अभिनंदन केले.
Views: 12