Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

108 पाकळ्या असलेल्या कमळाच्या नव्या जातीचे अनावरण; दिले “नमोह 108” नाव.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 20, 2023
in india
0
108 पाकळ्या असलेल्या कमळाच्या नव्या जातीचे अनावरण; दिले “नमोह 108” नाव.
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज लखनौ इन्स्टिट्यूट सीएसआयआर-एनबीआरआय (नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) ने विकसित केलेल्या “कमळ” फुलाच्या 108 पाकळ्या असलेल्या नवीन जातीचे अनावरण केले. ‘एनबीआरआय नमोह 108’ नावाचे कमळ सीएसआयआर या लखनौमधील वनस्पती विज्ञान संशोधन बहुविद्याशाखीय अत्याधुनिक अशा राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्थेने विकसित केले आहे.

ह्या नव्या जातीचे आणि एनबीआरआयच्या नव्या उत्पादनांचे राष्ट्रार्पण करतांना, डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “कमळ फुलाचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, ही नवी जाती, या फुलाला विशेष ओळख देणारी ठरली आहे.”

नमोह 108 कमळ जातीची फुले मार्च ते डिसेंबर या महिन्यात फुलतात आणि यात खूप जास्त पोषक मूल्ये आहेत. हे कमळाचे पहिलेच असे वाण आहे, ज्याची संपूर्ण जनुक क्रम रचना, त्याच्या वैशिष्ट्यांसाठी करण्यात आली आहे.

डॉ जितेंद्र सिंह यांनी कमळाच्या तंतूपासून तयार केलेले वस्त्र आणि फुलांचा सुगंधी अर्क काढून बनवलेले ‘फ्रोटस’ ह्या अत्तराचेही अनावरण केले. हे अत्तर एनबीआरआयने एफएफडीसी, कन्नौजच्या सहकार्याने कमळ संशोधन कार्यक्रमांतर्गत विकसित केले आहे.

ह्या नव्या वाणाला, ‘नमोह 108’ असे अभिनव नाव दिल्याबद्दल एनबीआरआयचे कौतुक करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्यकाळाच्या दहाव्या वर्षीही नरेंद्र मोदी यांचे अथक कार्य आणि त्यांच्या परिश्रमाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही सुंदर सुगंधी भेट आहे.

यावेळी कमळ अभियानाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. “हा प्रकल्प इतर प्राधान्य योजनांप्रमाणे मिशन मोडमध्ये हाती घेतला जात आहे – राष्ट्रीय मध आणि मधमाशी अभियान (NHBM), राष्ट्रीय बांबू अभियान (NBM), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM), राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF), राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA), गोकुळ अभियान, नील क्रांती, शक्ती अभियान – एकीकृत महिला सक्षमीकरण कार्यक्रम आणि आंतरशाखीय सायबर- प्रत्यक्ष व्यवस्थाविषयक राष्ट्रीय अभियान, अशा सर्व अभियांनाप्रमाणेच हे अभियानसुद्धा पूर्ण कार्यक्षमतेने राबवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र सरकारने, आता अरोमा मिशनच्या यशानंतर, हे लोटस अभियान सुरू केले आहे. आपले सरकार केवळ अभियान, योजना किंवा प्रकल्प सुरू करत नाही, तर त्यांची निर्धारित वेळेत अंमलबजावणी पूर्ण होईल, हे ही सुनिश्चित करते, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला आहे,” असे ही जितेंद्र सिंह म्हणाले.

यावेळी पुनर्वापराच्या दुसर्या अभिनव उपक्रमात, डॉ जितेंद्र सिंग यांनी विविध कामांसाठी लागणाऱ्या नैसर्गिक रंगांचेही अनावरण केले. मंदिरांमध्ये अर्पण केलेल्या फुलांच्या निर्माल्यातून एनबीआरआय’ने हे नैसर्गिक रंग तयार केले आहेत. या हर्बल रंगांचा वापर रेशीम आणि सुती कापडासाठी देखील केला जाऊ शकतो.

डॉ. सिंह यांनी “एनबीआरआय -निहार’ नावाच्या कोरफडीच्या नवीन जातीचेही अनावरण केले. ही कोरफड साधारण कोरफडीच्या तुलनेत अंदाजे अडीचपट जास्त जेलचे उत्पादन करते. प्रात्यक्षिकानुसार ‘एनबीआरआय-निहार’ कोरफड जिवाणू आणि बुरशीजन्य रोगांवर सर्वात कमी प्रभावित असल्याचे आढळले आहे. सामान्य खोकला आणि सर्दी बरी करण्यासाठी ‘हर्बल कोल्ड ड्रॉप्स’ आणि मार्क लॅबोरेटरीजने बनवलेले हर्बल अँटी डँड्रफ हेअर ऑइल या दोन हर्बल उत्पादनांचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.

त्याशिवाय, ह्या संस्थेने विकसित केलेल्या 500 कच्च्या औषध भांडारांच्या डेटाबेसचे देखील डॉ. सिंह यांनी उद्घाटन केले. भारतीय औषध निर्माण मानकांच्या अनुसार हा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. तसेच सीएसआयआर – एनबीआरआय उद्यानातील गुलाबांविषयीच्या पुस्तकाचेही त्यांनी प्रकाशन केले. यात या उद्यानात विकसित उच्च वाणाच्या गुलाबांची माहिती देण्यात आली आहे. तसेच, सीएसआयआर – एनबीआरआय आणि मेसर्स न्यूक्लोम इन्फॉरमॅटिक्स हैदराबाद यांच्यात यावेळी कापसावरील सहकार्य संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. लोकांमध्ये सहजतेने माहिती प्रसारित करण्यासाठी ‘सीएसआयआर-एनबीआरआय डिजिटल हर्बेरियम, भारतातील वनस्पतींच्या नमुन्यांचे राष्ट्रीय भांडार, आणि ‘उत्तर प्रदेशातील वनस्पती संपदा’ आणि ‘उत्तर प्रदेशातील ई-फ्लोरा’ वरील पुस्तक देखील प्रकाशित करण्यात आले. ई-फ्लोरा या पुस्तकात, उत्तर प्रदेशातील 5,000 पेक्षा जास्त वनस्पतींची यादी आणि माहिती आहे.

तसेच उंचावर थंड प्रदेशात तैनात लष्कराच्या जवानांसाठी एनबीआरआय गाऊट ह्या अस्थिरोगावरील औषध आणि पोषक आहारयुक्त उत्पादनांचेही उद्घाटन केले.

डॉ जितेंद्र सिंह यांनी 14 ते 19 ऑगस्ट 2023 या कालावधीत एनबीआरआय द्वारे आयोजित केलेल्या सहा दिवसांच्या संकल्पना-आधारित कार्यक्रमाला देखील भेट दिली, ज्यामध्ये प्रयोगशाळेतील अत्याधुनिक संशोधन, उत्पादने आणि तंत्रज्ञान, विविध भागधारकांना कौशल्ये आणि सुविधा प्रदर्शित करण्यात आल्या.

डॉ जितेंद्र सिंग यांनी न्यूट्रा-सेंट्रल मूळ उप-उत्पादनांना समर्पित प्रदर्शनाचे उद्घाटनही केले आणि प्रत्येक स्टॉलवर फिरून उत्पादनांच्या विविध पैलूंवर चर्चा केली.

Post Views: 176
Previous Post

अव्दैत-नेत्रा शोधणार मनोरमाचं रहस्य

Next Post

ऑगस्टमध्ये शिक्षक भरतीची शक्यता धुसरच

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ऑगस्टमध्ये शिक्षक भरतीची शक्यता धुसरच

ऑगस्टमध्ये शिक्षक भरतीची शक्यता धुसरच

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1011733

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!