सोलापूर – दिवाळीचा सण जवळ येत असतानाच सोलापूर शहरातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचे पडसाद थेट भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्या संतापातून उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काँग्रेस शहराध्यक्षांच्या निवासस्थानी मध्यरात्री आमदार कोठे यांनी भेट दिल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक आणि बाचाबाची झाल्याची घटना घडली. त्यानंतर सकाळी कोठे समर्थकांनी काँग्रेस भवनासमोर दुग्धाभिषेक केल्याने या राजकीय संघर्षाला आणखी धार आली.
काँग्रेसच्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या राजकीय तणावाने रात्रीच्या सुमारास वेगळेच वळण घेतले. आमदार देवेंद्र कोठे यांनी थेट काँग्रेस शहराध्यक्षांचे निवासस्थान गाठल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावेळी दोन्ही बाजूंकडून आक्रमक भूमिका घेतली गेल्याने वातावरण तापले. मध्यरात्री झालेल्या या घडामोडींची चर्चा सकाळपर्यंत शहरभर पसरली.
दरम्यान, सकाळी कोठे समर्थकांनी काँग्रेस भवनासमोर दुग्धाभिषेक करून आपली भूमिका आक्रमकपणे मांडली. या कृतीमुळे काँग्रेस-भाजपमधील संघर्ष रस्त्यावर आल्याचे चित्र निर्माण झाले. आंदोलन, मध्यरात्रीची भेट आणि त्यानंतरचा दुग्धाभिषेक अशा घटनांच्या मालिकेमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
विशेष म्हणजे, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात सणासुदीची लगबग सुरू असताना राजकीय पक्षांनी मात्र आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फोडण्यास सुरुवात केली आहे. आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही या संघर्षाकडे पाहिले जात आहे.
एकीकडे काँग्रेसने आंदोलनातून भाजपला लक्ष्य केले, तर दुसरीकडे भाजप आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे सोलापूरच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडली असून, दिवाळीपूर्वीच शहरात राजकीय फटाक्यांची आतषबाजी सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.
आता या संघर्षाला दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय दिशा देतात आणि आगामी काळात हा वाद आणखी चिघळणार की राजकीय पातळीवरच मर्यादित राहणार, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
Views: 8