पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील नागरी आघाडीचे अध्यक्ष अरिफखान पठाण व त्यांच्या सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या पदाधिकाऱ्याच्या निवडीसाठी नागरी आघाडीचे मावळते अध्यक्ष अरिफखान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली नागरी आघाडीच्या कार्यकर्त्याची बैठक चैतन्य सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रास्ताविकात पार्टीचे प्रसिद्धी प्रमुख दामोदर लोखंडे यांनी पदाधिकारी निवडी पाठीमागील पार्श्वभूमी सांगून संभाव्य पिलीव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी निवडीमध्ये तरुणांना वाव देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त करून कार्यकारणीही सामाजिक समतोल व समाजातील प्रत्येक घटकाला कार्यकारणीत पद दिले जावे अशी सूचना यावेळी केली. यावेळी अरीफखान पठाण ,अमोल मदने पाटील डॉक्टर मिलिंद गुळभिले,जीवन गोरे ,अविनाश घमिरे ,राजेंद्रसिंग जामदार ,अजय खुर्द ,आमिनखान पठाण राजाभाऊ काकडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सर्वानुमते खालील प्रमाणे पदाधिकाऱ्याच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या अध्यक्षपदी माजी सरपंच अमोल मदने पाटील उपाध्यक्षपदी जीवन (गुरव) गोरे अतुल जामदार सचिव पदी अजय खुर्द कार्याध्यक्षपदी देविदास लोखंडे संघटक पदी शशिकांत लोखंडे धीरज बोडरे वैभव पिसे पार्टी प्रवक्तापदी विजय पिसे, वैभव वगरे खजिनदार पदी सागर भैस सुशील करडे व मंजूर मुजावर त्याचप्रमाणे यावेळी कोअर कमिटी स्थापना करण्यात आली. यामध्ये दामोदर लोखंडे अरिफखान पठाण डॉक्टर मिलिंद गुळभिले कल्याण बापू जावळे,रामचंद्र उर्फ नानासाहेब देशमुख लक्ष्मण काळे, राजेंद्र सिंग जामदार कुमारसिंग भैस दशरथ काळे किसन सातपुते राजेंद्र काकडे शंकर शेंडगे, दत्तात्रय
भैस ,संग्राम पाटील रामा मजार संजय रोकडे गोविंद भैस गोरख जरग,यावेळी सूत्रसंचालन विजय पिसे माळी ,आभार प्रदर्शन अमोल मदने पाटील, जीवन गुरव यांनी व्यक्त केले
फोटो_ नागरी आघाडीचे नुतन पदाधिकारी अमोल मदने पाटील,जीवन गोरे,व इतर मान्यवर.
Views: 11