Friday, November 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दीपावली २०२६ निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा पारंपरिक अलंकारांनी मनोहारी साज

तरुण भारतbyतरुण भारत
November 6, 2026
in west maharashtra
0
दीपावली २०२६ निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा पारंपरिक अलंकारांनी मनोहारी साज
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली महोत्सव धार्मिक उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. वसुबारसपासून दीपावली महोत्सवास प्रारंभ झाला असून, या मंगलपर्वानिमित्त श्री विठ्ठल, श्री रुक्मिणी माता तसेच परिवार देवतांना परंपरेनुसार विविध आकर्षक व मौल्यवान पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे रूप अधिकच मनोहारी व तेजस्वी दिसत असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या अलंकारांचे विशेष आकर्षण निर्माण झाले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. प्रविणकुमार घम यांनी दिली.
 श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, नामनिळाचा, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड, हिऱ्याचे कंगन जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, मत्स्य जोड, मोठा शिरपेच, लहान शिरपेच, तुळशीची माळ, एकदाणी, तोडे जोड, मोहरांची माळ, जवेची माळ इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
तसेच श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, तांबडी चिंचपेटी, जवमनी पदक, लक्ष्मीहार, जवेच्या माळा, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी व कंबरपट्टा इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
मंदिरातील परिवार देवतांनाही दीपावलीनिमित्त पारंपरिक अलंकारांनी सजविण्यात आले आहे. राधिका मातेस नक्षीदार टोप, मोत्याचा कंठा नेकलेस व पुतळ्यांची माळ, तर सत्यभामा मातेस सिद्धेश्वर टॉप, मोत्याचा कंठा, ठुशी व पुतळ्यांची माळ इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे *श्री व्यंकटेशास झनक-झनक हार, कोयरी हार, तुळशीचा हार, शाळीग्राम हार, मोहनमाळ व सूर्यकळीचा हार व महालक्ष्मी मातेस सोन्याचे कंगन मोत्याची कंठी लक्ष्मीपदक लॉकेट इमिटेशन नेकलेस पुतळ्यांची माळ अष्टपैलू मण्याची कंठी चांदीची छत्री असे विविध पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
दीपावली हा प्रकाशाचा, मांगल्याचा व आनंदाचा सण असल्याने मंदिर परिसरातही उत्सवाचे विशेष वातावरण निर्माण करण्यात आले आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन व दीपावली पाडवा या सणांच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप तसेच भक्तनिवास या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला असून, भाविकांसाठी हे आकर्षण ठरत आहे.
दीपावलीच्या मंगलपर्वात श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचे पारंपरिक पोशाख व अलंकारांचे मनोहारी रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनाचा लाभ घेण्यासाठी पंढरपूर येथे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मंदिर समितीच्या वतीने भाविकांना सुलभ व सुव्यवस्थित दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंगलमय दर्शन व पारंपरिक अलंकारांचे दर्शन भाविकांसाठी विशेष पर्वणी ठरत आहे, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगितले.
Views: 11
Previous Post

बेलाटी येथून सिमेंटचे पोल चोरीला; तिघांवर गुन्हा दाखल 

Next Post

नागरीआघाडीच्या अध्यक्षपदी अमोल मदने_ पाटील तर उपाध्यक्षपदी जीवन गोरे व अतुल जामदार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नागरीआघाडीच्या अध्यक्षपदी अमोल मदने_ पाटील तर उपाध्यक्षपदी जीवन गोरे व अतुल जामदार

नागरीआघाडीच्या अध्यक्षपदी अमोल मदने_ पाटील तर उपाध्यक्षपदी जीवन गोरे व अतुल जामदार

ताज्या बातम्या

#breakingnews #bjp #congress #viralshorts #solapurnews

November 6, 2026
आरोग्यमंत्र्यांचा कुर्डुवाडी दौरा: खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा इशारा

आरोग्यमंत्र्यांचा कुर्डुवाडी दौरा: खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा इशारा

November 6, 2026
विद्यार्थ्यांनी साकारले रंगीबेरंगी आकाश कंदील

विद्यार्थ्यांनी साकारले रंगीबेरंगी आकाश कंदील

November 6, 2026
प्रीती  घाडगे यांची छावा संघटनेच्या मोहोळ तालुकाध्यक्षपदी निवड

प्रीती  घाडगे यांची छावा संघटनेच्या मोहोळ तालुकाध्यक्षपदी निवड

November 6, 2026
करमाळा काँग्रेसचा उजनी AI डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; प्रकल्प रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

करमाळा काँग्रेसचा उजनी AI डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; प्रकल्प रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

November 6, 2026

धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७७ पदव्युत्तर जागा

November 6, 2026

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी 

November 6, 2026

#solapurnews #marathinews #vasubaras2026 #hindufestival #viralshorts

November 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1471611

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!