सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत ऑर्किड महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर झोनल फुटबॉल स्पर्धेत ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेत ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. पारप्पा पाटील, शुभम आरवत, ऋषिकेश माडे, सैफ नाईकवाडी, प्रितेश श्रीराम आणि वेदांत जवंजळ यांच्या दमदार खेळीमुळे संघाने स्पर्धेत आपली छाप पाडली. अंतिम सामन्यात संघाने विजयासाठी अखेरपर्यंत जोरदार संघर्ष केला; मात्र अत्यंत अटीतटीच्या लढतीत निसटता पराभव स्वीकारावा लागला आणि संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या यशामागे क्रीडा विभाग संचालक शिवशरण कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष सिद्वेश्वर पाटील, सचिव शिवानंद पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार, सर्व विभागप्रमुख, सर्व विभाग क्रीडा समन्वयक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धांसाठी संघाला शुभेच्छा दिल्या.
*फोटो ओळ : सोलापूर झोनल फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलेल्या ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खेळाडूंसोबत क्रीडा संचालक शिवशरण कोरे, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार व ऑफिस सुप्रिटेंडंट अश्विन सावळगी.*