जालना : पल्स पोलिओ लसीकरण मोहिम, स्टॉप डायरिया कॅम्पेन एमआर निर्मुलन व नियमित लसीकरण, एचपीव्ही लसीकरण. एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, आशा कार्यबल गट सभा, ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान आदी विषयावर आज उपविभागीय अधिकारी जालना यांच्या अध्यक्षेत सभा संपन्न झाल्या.
यावेळी सहायक महसुल अधिकारी संदीप डेबडे, डॉ. सुदाम गवारे वैद्यकिय अधिक्षक, पक्षक, महिला व बाल रुग्णालय जालना डॉ. विजय वाकोडे वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय नेर, तहसीलदार यांचे प्रतिनीधी,गट विकास अधिकारी याचे प्रतिनिधी, एकात्मीक बाल विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, डॉ. श्याम राठोड तालुका आरोग्य अधिकारी प्राथमि आरोग्य केंद्र वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहाय्यक व सहाय्यीका तालुका आरोग्य अधिकारी स्तरीय स्टाफ यांची उपस्थिती होती.
पल्स पोलिओ लसिकरण मोहिम, स्टॉप डायरिया कॅम्पेन, एमआर निर्मुलन व नियमित लसीकरण मोहिम :- 28 जुलै 2026 रोजी राबविण्यात येणार असुन यात 0 ते 05 वर्ष वयो गटातील बालकाचे लसीकरण करण्यात येणार आहे यात लसीकरण करीता 227 बुथ व कर्मचारी 611 आहेत, मोबाईल टिम 13, ट्राझीट टिम 14 आहेत.
एचपीव्ही लसीकरण :- एचपीव्ही लसीकरण 14 वर्षे वयोगटातील (ज्यांनी 14 वर्षे पूर्ण केलेली आहेत व 15वर्षे पूर्ण केलेली नाहीत) मुलींना देण्यात येईल. मोहिम सुरू झाल्यानंतर तर पुढील 90 दिवसांच्या कालावधीत 15 वर्षे पूर्ण होणाऱ्या मुली देखील या तीन महिन्यांच्या एचपीव्ही (एचपीव्ही) लसीकरणमोहिमेत लसिकरणास पात्र राहतील. एकूण लोकसंख्येच्या 1 टक्का लाभार्थी ही मोहिमेकरीता अपेक्षित लाभार्थी असतील.
एकात्मीक आरोग्यवर्धिनी समिती :- राज्य शासनाने संदर्भिय शासन निर्णय दि. 14 मे 2026 अन्वये राज्यातील आरोग्य विषयक उपक्रम लोकाभिमुख, गतिमान व बळकट करण्यासाठी आरोग्य संस्थाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांच्या दर्जात गुणात्मक व परिणामकारक वाढ / सुधारणा करणे, आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व राज्य धोरणातंर्गत आरोग्य सेवा सुलभरितीने जनतेला उपलब्ध करुन देणे, नागरिक/रुग्णांच्या आरोग्य विषयक समस्यांचे गुणात्मक निराकरण करणे, संस्था/विभागातंगर्गत समन्वय स्थापित करणे, आरोग्य विषयक उपक्रम/कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करणे, आरोग्य उपक्रमांमध्ये समुदाय सहभाग अधिक व्यापक करणे व आरोग्य संस्थांचा गुणांकन दर्जा सुधारणे या व्यापक दृष्टीने राज्यात ग्रामीण क्षेत्रातील विधानसभा मतदार संघ / महानगरपालिका क्षेत्रातील विधानसभा मतदार संघ, जिल्हा व राज्य स्तरावर “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती “स्थापित करणे बाबत निर्देश दिले आहेत.
आशा कार्यबल गट सभा :- आशा कार्यबल गटाची सभा आयोजीत करण्यात आली, तालुकांतर्गत आशा सवयंसेवीका योजनेची अंमलबजावणी सुरु असुन, राष्ट्रीय आरोग्य अभीयानांतर्गत ग्रामीण व विशेषत आदिवासी क्षेत्रातील प्रत्येक गावात वाडया व वस्ती स्तरावर स्थानिक आरोग्य कार्यकती असावी या दृष्टीकोनातुन आशा कार्यकती यांची निवड करण्यात आली. आशा स्वयंसेवीका यांना दरमहा कामावर आधारीत मोबदला अदा करण्यात येतो. त्याअनुषगांने कार्यक्षेत्रात येणा-या अडी-अडचणीचे निराकरण करण्यासाठी तसेच ज्या कार्यक्षेत्राचे कामकाज कमी होत आहे, गरोदर माता व लसीकरण, पिएमजेवाय, आभा कार्ड, टिबी, लेप्रसी लेप्रसी, युव्हीन आरसीएच, इत्यादी पोर्टल व लाभार्थी नोंदणी, आरोग्य सेवा बाबत आशा स्वयंसेवीका यांना कार्यक्षेत्रात येणा-या अडचणी व तक्रारी या बाबत तालुकास्तरीय तक्रार निवारण प्रणाली स्थापन करण्याबाबत केंद्र शासनाकडुन प्राप्त झालेल्या सुचना नुसार आयोजीत करण्यात आली.
माझं गांव आरोग्य संपन्न गांव अभियान यात 1 एप्रिल 2026 रोजी विशेष ग्रामसभा आयोजीत करणे बाबत शासन स्तरावरुन निर्णय निर्गमीत करण्यात आला, आयुक्त आरोग्य विभाग मुंबई याचे पत्र व शासन निर्णय या वरुन तालुका स्तरावर अभियान बाबत कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेत वरिल मान्यवर व अधिकारी यांनी खालील प्रमाणे मार्गदर्शन घेऊन अभियान यशस्वी रित्या पुर्ण करणे बाबत कळविले.
अभियानाच्या यशस्वी अमलबजावणी करीता तालुकास्तरीय समन्वय व नियोजन करणे तालुका व ग्रामस्तरीय यंत्रणा यांना मार्गदर्शन देणे, प्रगतीचा नियमीत आढावा घेऊन कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतीनी सदर अभियानात सक्रीय सहभाग नोंदवुन ग्रामस्तरावर आरोग्य विषयक जनजागृती. तपासणी शिबीर, स्वच्छता उपक्रम, जिवनशैली सुधारणा, नागरिकाचे आरोग्यमान उंचावणे, संसर्गजन्य / असंसर्गीक आजाराचे प्रमाण कमी करणे, माता व बाल आरोग्य निर्देक्षांक सुधारण्याच्या उदेशाने सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत माझं गांव आरोग्य संपन्न गांव ” अभियान राबविण्या बाबत निर्णय घेण्यात आला असुन आदी उपक्रम प्रभावीपणे राबवणे बाबत पदाधिकारी यांनी तालुकास्तरीय व अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा पंचायात समिती, जालना येथे दि. 27 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आली.
सहाय्यक महसुल अधिकारी याच्या उपस्थीतीत तालुका आरोग्य अधिकारी जालना यांनी वरील विषयी मार्गदर्शन व कर्मचारी यांना सुचना देण्यात आल्या.



















