याबाबतचे वृत्त असे की अल्पवयीन असलेली तरुणी श्रीपूर येथिल चंद्रशेखर विद्यालयात घरुन चालत निघाली होती . घरापासून काही अंतरावर ती आली असता मागून मोटार सायकल वरून जीवन तरुण तिला निर्मनुष्य ठीकाणी अडवतो व अश्लील हाव भाव व चाळे करत करत असताना तरुणी विरोध करत मला शाळेत जाणेस उशिर होत आहे मला सोड मी आई – वडिलांना तुझे नांव सांगेन असे म्हणताच कोणालाही सांग मी भित नाहीअसे म्हणत रस्त्या लगत असलेल्या ऊसाचे शेतात नेण्याचा प्रयत्न करत असताना हाताला हिसका देवून त्याचे तावडीतून सुटून ती घरी येवून थोरल्या बहिणीस झालेला प्रकार सांगते यावर तू घाबरू नकोस आईवडिल घरी आल्यावर त्यांना मी सांगते तू शाळेत जा असे म्हणून शाळेत पाठवते यावर शाळेत आल्यावर झालेला प्रकार मुख्याध्यापक प्रा . बनसोडे यांना सांगितला त्यांनी तात्काळ आई वडिलांना बोलावून तात्काळ पोलिसात ह्या घटनेची खबर दिली . यावर निर्भया पथकाच्या प्रमुख करिष्मा वनवे व सहकारी पोलिसांनी आरोपी जीवन घाडगे यांस अटक करून गुन्हा दाखल केला . कोर्टाने आरोपीस ५ दिवसांची पोलिस कस्टडी सुनावली आहे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















