सोलापूर ः बहुप्रतिक्षित असलेला माता रमाई यांचा पुतळा बुधवारी रात्री सोलापूरात दाखल झाला. सोलापूरात पुतळा दाखल झाल्यावर रमाईच्या लेकींनी गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत त्याचे स्वागत केले. न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे.
मागील पाच सहा वर्षांपासून याची सर्वांना प्रतिक्षा होती. या उद्यानाचे नुतनीकरण करण्यात येत आहे. विविध सोयीसुविधा या उद्यानात असणार आहेत. परंतू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी उभारण्यात येणारा हा पुतळा पूर्ण होणे बाकी होते. अखेर पुण्याच्या आल्हाट आर्टसने याचे काम पूर्ण करत सोलापूरकरांसाठी हा पुतळा मंगळवारी मार्गस्थ केला. प्रारंभी पुणा नाका व नंतर सम्राट चौकात याचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक गौतम कसबे, माजी नगरसेवक अरुण भालेराव, बबलू गायकवाड, कामगार नेते
अशोक जानराव, ॲड. संजीव सदाफुले, दशरथ कसबे, अजित गायकवाड, , गौतम चंदनशिवे, देवा उघडे आदींसह अनेक अनुयायांनी स्वागत केले. महिलांनी गुलाबाच्या पाकळ्या ऊधळून फुगडी घालून आनंद व्यक्त केला.
—-
Post Views: 15