मंगळवेढा – इतर कोणत्याही व्यवसाय पेक्षा अजून बऱ्यापैकी शिक्षण क्षेत्रात नैतिकता उरली आहे शिक्षकानी अकारण नम्र असू नये शिक्षक थोडासा आक्रमक असला पाहिजे त्याच्या ज्ञानाचा चरित्र्याचा दरारा पाहिजे शिक्षकाला पाहिले की व्यवस्थेच्या मनात धडकी भरली पाहिजे. कोण माणूस किती शिकला हे महत्त्वाचे नसून तो काय करतो हे महत्त्वाचे आहे. फारसे न शिकलेल्या लोकांनीही फार मोठ्या जबाबदाऱ्या महाराष्ट्रात पार पाडल्या आहेत आपल्यामध्ये आत्मविश्वास किती आहे हे फार महत्त्वाचे.असे प्रतिपादन प्रा प्रदीप पाटील यानी केले.ते प्रेरणा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कृतिशील शिक्षक व वाचक पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षपदावरुन बोलत होते.
या वेळी पुरस्कार वितरण करताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सोलापुर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी म्हणाले आजचा हा सोहळा म्हणजे केवळ शिक्षक दिनाचे आणि वाचन प्रेरणा दिनाचे मंगल मिलन नाही, तर ‘प्रेरणा प्रतिष्ठान’ने शिक्षणाच्या ज्ञानगंगेत आपले सर्वस्व अर्पण केलेल्या कृतिशील शिक्षकांचा केलेला कृतज्ञ सन्मान आहे. आज येथे उपस्थित असलेले प्रत्येक शिक्षणप्रेमी आणि वाचनप्रेमी पुस्तकांचा सागर आणि ज्ञानाचा किनारा यांचा साक्षीदार आहे.
या सोहळ्यामुळे, प्रत्येक शिक्षकाचे आणि वाचकाचे मनोबल उंच शिखरावर पोहोचले आहे. हा सन्मान त्यांना भविष्यात अधिक तेजाने तळपण्याची प्रेरणा देईल, यात शंका नाही!
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे विभागीय सचिव कल्याणराव शिंदे, कवी मारुती कटकधोंड यानीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्राथमिक शिक्षक जनार्दन वाघमारे ( सोलापुर) अनिता क्षिरसागर ( मंगळवेढा) माध्यमिक शिक्षक मनिषा पाटील ( हवेली देशिंग ) सचिन धनवट ( पुणे )उच्च माध्यमिक शिक्षक प्रा.डॉ. मच्छिंद्रनाथ नागरे ( केम)आणि महाविद्यालयीन शिक्षक प्रा.डॉ. अरुण कोळेकर ( सासवड) याना कृतिशील शिक्षक पुरस्काराने तर वाचकदिनाच्या औचित्याने दिला जाणारा
ज्ञानेश्वर षडानन् जडे स्मृती बहुश्रुत वाचक पुरस्कार प्रा.संतोष मनोहर फटे ( श्री.संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा) याना तर
स्व. इंदुमती ज्ञानेश्वर जडे स्मृती वाचन प्रेरणा पुरस्कार प्रा. सविता दुधभाते ( उमा शिक्षण शास्र महाविद्यालय,पंढरपुर) याना देण्यात आला.पुरस्कार्थींच्यावतीने मनिषा पाटील, प्रा.डाॅ.मच्छिंद्र नागरे व प्रा.डाॅ. अरुण कोळेकर यानी सत्कारास उत्तर दिले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रेरणा प्रतिष्ठानचे प्रेरणास्थान माजी शिक्षणाधिकारी ना.भि. पाटील याना श्रध्दांजली वाहण्यात आली.
दिपप्रज्वलन व्यासपिठावरील मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या वेळी माजी नगराध्यक्षा अरुणा माळी व बळीराजा पतसंस्थेचे चेयरमन दामोदर देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारती धनवे यानी तर रंगतदार सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन दया वाकडे यानी केले.
समारंभास प्रेरणाचे अध्यक्ष प्रकाश जडे,उपाध्यक्ष ए.बी.शेख, संभाजी सलगर दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे,रेखा जडे, अर्चना सलगर, अॅड.रमेश जोशी. लहु ढगे,पोपट महामुरे, वैभव मोडक ,डाॅ.अतुल निकम ,अमोल मिरजकर,
ज्ञानदीप उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब भोरकडे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.
























