Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दया हेच खरे आत्मिक सौंदर्य : डॉ. चागंटी कोटेश्वर राव

तरुण भारतbyतरुण भारत
November 10, 2025
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सौंदर्य फक्त डोळ्यांनी पाहता येते, पण दया (करूणा) ही पाहण्याची गोष्ट नसून ती प्रत्यक्ष करण्याची गोष्ट आहे. दया हेच खरे आणि सर्वात मोठे सौंदर्य आहे, असे प्रतिपादन डॉ. राव यांनी वल्याळ मैदानावर सुरू असलेल्या श्री माता देवी वैभवम विषयावर दुसऱ्या दिवशी आध्यात्मिक प्रवचनात केले. ते म्हणाले की, जर प्रत्यक्ष चालणारा देव पाहायचा असेल, तर शंकराचार्यांचे दर्शन घ्यावे.

​प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सद्गुरूंचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ.राव पुढे म्हणाले की, जगद्गुरु  चंद्रशेखर सरस्वती यांचा फोटो आजही प्रत्येक घराघरात दिसतो. यामागे कारण म्हणजे त्यांच्या हृदयात असलेली दया व कृपाळू भाव प्रत्येकाला अनुभवायला मिळतो. ज्यामुळे ते आजही पूजनीय व लोकांच्या स्मरणात आहेत.

​डॉ. राव यांनी देवी मातेचे स्वरूप स्पष्ट करताना सांगितले की, देवी मातेला समजून घेण्यासाठी आधी आपल्या आईला समजून घेतले पाहिजे. देवतांचे वर्णन पायापासून डोळ्यांपर्यंत आहे, तर देवी मातेचे वर्णन शास्त्रात केशापासून नखापर्यंत सांगितले आहे. देवीमाता ही साऱ्या जगाची माता आहे, म्हणूनच ललिता सहस्त्रनामावली मध्ये ‘अम्मा’ (आई) नावाने सुरुवात केली जाते.

​देवी मातेची कांती सूर्यासारखी असते आणि तिचा लाल रंग बदलाचे संकेत देतो. आत्म्याचा कितीही जन्म प्रवास झाला, तर त्याला बदल म्हटले जाते. पोटातील बाळाची वाढ कशी होते, याचे ज्ञान फक्त आईलाच असते. मानवाच्या आयुष्यात बदल घडविणारी आईच आहे. ‘कुठून आलो, किती जन्म घेतले’ हा सर्व बदल घडवणारी माता देवीच आहे.

​व्यासमुनी आणि शंकराचार्यांनी सर्वप्रथम देवी मातेच्या भुजांचे वर्णन करून नंतर देवी मुखाचे वर्णन का केले,  याचा अभ्यास आपण केला पाहिजे. त्यांच्यामुळेच आपल्याला कांची कामाक्षी देवी मातेच्या स्वरूपात एक रूप पहायला मिळते, असेही डॉ. राव यांनी नमूद केले.

​

ज्याप्रमाणे आई स्वतःचे दूध बाळाला पाजून मोठे करते, त्याचप्रमाणे देवी माता सृष्टीचे पालनपोषण करून तिला सुंदर बनवते. झाडे, शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी यांच्यातील अन्नसाखळीप्रमाणेच, देवी मातेचा आशीर्वाद नसेल, तर अध्यात्म घडू शकणार नाही. हा आशीर्वादच सृष्टीतील सर्व घडामोडी चालवतो.

​

कार्तिक अमावस्येच्या चंद्रबिंबात देवीचे रूप पाहणाऱ्याला मोक्षप्राप्ती होते. चंद्रबिंब आणि तलावातील कमल पुष्पांकडे पाहून जसे मन प्रसन्न होते, अगदी त्याचप्रमाणे देवी मातेचे मुख मंडल पाहिल्यानंतर मनाला प्रसन्नता लाभते.

​

शंकराचार्य आणि व्यासमुनी दोघांनीही स्पष्ट केले आहे की, सुख-दुःख भोगण्यासाठी जसे मानवी शरीर आवश्यक आहे, त्याचप्रमाणे कर्माचे चांगले फळ मिळण्यासाठी देवी मातेचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. ८४ लाख योनीच्या प्रवासानंतर लाभलेल्या मानवी शरीराचा आणि बोलण्याचा वापर देवी मातेच्या भक्तीसाठी करून तिचा कृपा आशीर्वाद प्राप्त करावा. हात, पाय, डोळे, जीभ या सर्व अवयवांचा वापर चांगल्यासाठी करायला हवा. ज्या व्यक्तीमध्ये भक्ती भाव असतो, ते चांगले काम करतातच. परंतु ज्या व्यक्तीमध्ये चांगला भाव नसतो, तो देखील देवी मातेच्या कृपाशीर्वाधाने चांगले काम करू शकतो. देवी मातेचा आशीर्वाद सर्व काही घडवतो, असे डॉ. राव यांनी यावेळी सांगितले.

Post Views: 28
Previous Post

कर्तव्य, कृतज्ञता आणि प्रेरणा – प्रिसिजन गप्पा 2025 चा अर्थपूर्ण समारोप

Next Post

शिक्षकानी अकारण नम्र असु नये. समाजाला त्याचा दरारा वाटला पाहिजे  – प्रा. प्रदीप पाटील

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिक्षकानी अकारण नम्र असु नये. समाजाला त्याचा दरारा वाटला पाहिजे  - प्रा. प्रदीप पाटील

ताज्या बातम्या

हक्काच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना व्हावे लागले अर्धनग्न

June 4, 2026

आंदोलनाची वेगळी स्टाईल थेट टाकले दंडवत

June 4, 2026

पेट्रोल डिझेल खर्चाचा फटका असाही #marathinews #news

June 4, 2026

मराठा आरक्षण मोठी अपडेट #viral #news #marathinews

June 4, 2026

पंकजा मुंढेचा सैराट अंदाज …… स्वतः चालवला ट्रॅक्टर #marathinews #news #viral

June 4, 2026

आता जागा झाला मणियार……. #marathinews #news

June 4, 2026

भारीच ….पाहिले आहे का असे स्वागत?? #viral #news #marathinews

June 4, 2026

महागात पडले वृक्षतोड हजारे पाटील यांना एक कोटी १८ लाखांचा दंड

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893129

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697