सोलापूर – हॅलो मेडिकल फाउंडेशन आणि आलायव्हस लाईफ सायन्सेस संपूर्ण प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच दाराशा UPHC यांच्या सहकार्याने दिनांक १५-०७-२०२६ रोजी दाराशा येथे नवविवाहित जोडप्यांसाठी समुपदेशनाचा आगळावेगळा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पती-पत्नींनी एकमेकांविषयी प्रेम व सन्मान व्यक्त करण्याच्या अनोख्या उपक्रमाने झाली. यामध्ये पत्नीने पतीला गुलाबाचे फूल भेट दिले, तर पतीने पत्नीला गजरा वेणीत लावला.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अस्मिता बालगावकर यांनी वैवाहिक जीवनात एकमेकांच्या भावना समजून घेणे, परस्परांचा सन्मान करणे आणि महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेण्याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.
तसेच दाराशा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी गर्भनिरोधक साधने दाखवून त्याचे महत्व सांगितले. डॉ. संस्कृती स्त्री रोग तज्ज्ञ यांनी वैवाहिक जीवनाची सुरुवात करताना योग्य वेळी बाळाचे नियोजन (फॅमिली प्लॅनिंग) करण्याबाबत मार्गदर्शन केले. PHN अस्मिता खडतरे यांनी शासकीय आरोग्य सेवांद्वारे उपलब्ध असलेल्या विविध लाभ व योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना संपूर्ण प्रकल्प समन्वयक जावेद यांनी केली, तर सूत्रसंचालन प्रियंका कांबळे यांनी केले. हा कार्यक्रम हॅलो मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्षा dr शुभांगी अहंकारी व कार्यकारी संचालक डॉ. क्रांती रायमाने यांच्या मार्गदर्शनाखाली, आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दाराशा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, PHN अस्मिता खडतरे, मेट्रन संगीता उपाध्याय, आरोग्य कर्मचारी व आशाताई यांनी मोलाचे सहकार्य केले.




















