सोलापूर – माहिती अधिकारात अर्ज करतो का असे म्हणून एका तरुणाला शिवीगाळ करून विटेने मारून जखमी केल्याप्रकरणी जोड भावी पेठ पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
महेश वाले ( रा. श्रीशैल नगर, भवानी पेठ, सोलापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत शिवशरण मल्लिनाथ माणिकशेट्टी (रा. ई/२७, श्रीशैल नगर, शेळगी, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी हे ३ जून रोजी सायंकाळी घराजवळील समर्थ किराणा दुकानासमोरील कट्टयावर बसले होते .त्यावेळी त्यांचे नातेवाईक यातील आरोपी महेश वाले हे तेथे आले व इरण्णा कोरे याचेविरुध्द माहिती अधिकारात अर्ज करतो का असे म्हणून चिडुन शिवीगाळ करुन विटेने फिर्यादी च्या कपाळावर व गालावर मारले . तसेच यातील आरोपी हा उग्र स्वभावाचा असुन त्याची दहशत असल्याने सोसायटीमधील लोक त्याला घाबरत असल्याचे ही फिर्यादीत म्हटले आहे .
पोलीस हवालदार दुधाळे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 4