सोलापूर – कर्ज फेडण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आण म्हणून एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घटस्फोट देण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह तिघा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
अप्पाशा व्हनमारे – पती , लक्ष्मीबाई- सासु, श्रीदेवी प्रकाश वाघमारे-नणंद (सर्व रा. किसान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत संगिता अप्पाशा व्हनमारे ( रा. ११२, स्वागत नगर, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी सन- २०१० ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान सासरी नांदत असताना वरील आरोपींनी मिळुन फिर्यादीस लग्नात संसार उपयोगी सामान दिले नाही, सोने पैसे दिले नाही, योग्य मानपान केला नाही. फिर्यादीचे चारित्र्यावर संशय घेवून अर्वाच्च शिवीगाळ करुन तसेच माहेरुन कर्ज फेडण्यासाठी ३ लाख रुपये घेवून ये म्हणून हाताने मारहाण करुन घटस्फोट देण्याची धमकी देवून छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस हवालदार नवले हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
Post Views: 6