सोलापूर – “काल माझ्याकडे का बघत होता?” या कारणावरून एका तरुणाला रस्त्यावर पाडून लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केल्याची घटना २९ मे रोजी पहाटे २ वाजता घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
आहे .
श्रीधर कुंदाराम, अमित शिंदे, अक्षय शिंदे, आदित्य म्हेत्रे, मोहसीन शेख आणि योगेश चिलेवर ( सर्व रा. एकता नगर, सोलापूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत श्रीधर सतीश चन्नोज (वय- ३० वर्षे, रा. ४२२, कर्णिक नगर, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी हा २९ मे रोजी पहाटे २ वाजता एमआयडीसी भागातील सिझन शॉप समोर असताना तु काल माझेकडे का बघत होता , तुला लय मस्ती आली आहे असे म्हणून वरील आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन अंगावर धावुन आले व रोडवर खाली पाडुन हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस हवालदार गायकवाड हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
Post Views: 4