Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘विद्यार्थी परिषद जिंदाबाद’ च्या गजरात अभाविपचे पूर्व कार्यकर्ता संमेलन उत्साहात

तरुण भारतbyतरुण भारत
December 27, 2025
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘विद्यार्थी परिषद जिंदाबाद’ च्या गजरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ता संमेलन उत्साहात झाले. अभाविपच्या स्थापनेत सिंहाचा वाटा असलेले प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून गुरुवारी श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात हे संमेलन झाले.

प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर अभाविपचे पूर्व राष्ट्रीय सहसंघटनमंत्री आणि जेष्ठ कार्यकर्ते सदाशिवराव देवधर, अभाविपचे पूर्व पूर्णवेळ कार्यकर्ते श्यामसुंदर जाजू, सहकार भारतीचे राष्ट्रीय पूर्व कार्यकर्ता संमेलनाचे प्रमुख संघटनमंत्री संजय पाचपोर, अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे विशेष निमंत्रित सदस्य प्रा. डॉ. प्रशांत साठे, पूर्व कार्यकर्ता संमेलन प्रमुख प्राचार्य गजानन धरणे, अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. शांतिनाथ बागेवाडी, महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत चाबुकस्वार, महानगरमंत्री अनघा जाधव उपस्थित होते. यावेळी प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यार्थी निधी प्रस्तुत यशवंतराव केळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित अभिवाचनाचा कार्यक्रम मिलिंद भणगे आणि सहकाऱ्यांनी सादर केला.

अभाविपचे पूर्व राष्ट्रीय सहसंघटनमंत्री सदाशिवराव देवधर म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना शैक्षणिक आणि सामाजिक कामाचे आदर्श उदाहरण आहे. समाज जीवनात वावरताना आपण समाजाचे देणे लागतो हा विचार अभाविपच्या वर्तमान आणि पूर्व कार्यकर्त्यांनी कायम सोबत ठेवावा.

सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर म्हणाले, विविध क्षेत्रांमध्ये उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचे काम अभाविपने केले आहे. अभाविपच्या पूर्व कार्यकर्त्यांनी देशभरात प्रचंड मोठे सेवा प्रकल्प कार्यरत केले आहेत. समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करण्याचे संस्कार अभाविपच्या कार्यकर्त्यांवर आहेत. मदनदासजी, सदाशिवराव देवधर, प्रा. यशवंतराव केळकर अशी महान कार्य करणारी व्यक्तिमत्वे सोलापूरने अभाविपच्या माध्यमातून भारतमातेच्या सेवेसाठी दिली आहेत, असेही श्री. पाचपोर याप्रसंगी म्हणाले.

अभाविपचे पूर्व पूर्णवेळ कार्यकर्ते श्यामसुंदर जाजू म्हणाले, प्रा. यशवंतराव केळकर हे उत्तम मनुष्य निर्माणाचे कार्य करत होते. नैतिकता शब्दातून सांगण्यापेक्षा ती कृतीत आणण्यावर त्यांचा भर होता. भाषणातील आदर्श प्रत्यक्ष जगणारे ते मार्गदर्शक होते.

अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे विशेष निमंत्रित सदस्य प्रा. डॉ. प्रशांत साठे म्हणाले, प्रत्येक कामाला कार्यकर्ता आणि प्रत्येक कार्यकर्त्याला काम अशी भावना ठेवून काम करणारे अभाविप हे ७६ वर्षांचे युवा संघटन आहे. देशभरात १ हजार ३६ पूर्ण वेळ कार्यकर्ते आणि आयटीआय ते आयआयटीपर्यंत ७६ लाख ९७ हजार सदस्य असणारी ही प्रचंड मोठी विद्यार्थी संघटना आहे, असेही प्रा. डॉ. साठे याप्रसंगी म्हणाले.

प्राचार्य गजानन धरणे यांनी प्रास्ताविक केले. चेतन शर्मा यांनी परिचय करून दिला. प्रा. सोनाली वैद्य यांनी सूत्रसंचालन तर प्रा. डॉ. प्रशांत चाबुकस्वार यांनी आभार प्रदर्शन केले. उर्वी पटेल आणि भाग्यश्री दिवसे यांनी म्हटलेल्या ‘वंदे मातरम’ ने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Post Views: 254
Previous Post

महापालिका प्रचार प्रमुखपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांची नियुक्ती

Next Post

मॉडेल क्रिकेट अकॅडमीस आपटे चषक; लातूरच्या रोहन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत पराभव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मॉडेल क्रिकेट अकॅडमीस आपटे चषक; लातूरच्या रोहन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत पराभव

ताज्या बातम्या

पेट्रोल डिझेल खर्चाचा फटका असाही #marathinews #news

June 4, 2026

मराठा आरक्षण मोठी अपडेट #viral #news #marathinews

June 4, 2026

पंकजा मुंढेचा सैराट अंदाज …… स्वतः चालवला ट्रॅक्टर #marathinews #news #viral

June 4, 2026

आता जागा झाला मणियार……. #marathinews #news

June 4, 2026

भारीच ….पाहिले आहे का असे स्वागत?? #viral #news #marathinews

June 4, 2026

महागात पडले वृक्षतोड हजारे पाटील यांना एक कोटी १८ लाखांचा दंड

June 4, 2026

*सावधान विचलीत करणारी दृष्य*नई जिंदगीत नाळही न कापलेल्या अवस्थेत आढळले पिशवीत नवजात अर्भक

June 4, 2026
नॅशनल स्पोर्ट्स ऑफ इंडियाच्या रन स्पर्धेत साईश्वर गुंटूक प्रथम

नॅशनल स्पोर्ट्स ऑफ इंडियाच्या रन स्पर्धेत साईश्वर गुंटूक प्रथम

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893023

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697