सोलापूर – महापालीका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचार संहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांच्या वतीने अवैध हातभट्टी निर्मिती केद्रावर/अवैध देशी विदेशी मद्य विक्री वाहतुकीवर व अवैध धाब्यावर कलम ६८ व ८४ नुसार केलेल्या धडक कारवाईत रूपये १८ लाख १३ हजार ११० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निर्देशानुसार भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर जे. एन. पाटील प्र.उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर याचे समवेत दि. २० व २१ डिसेंबर २०२५ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निमिती केद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण २२ गुन्हे नोंद करण्यात आले असुन २२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाईत १५,१४० ली. रसायन, १४६२लि. हातभट्टी दारु, ५६.० ब. लि. देशी मद्य, ३.० ब.ली. विदेशी मद्य, ८.० ब.ली. बिअर, तसेच ०१ चार चाकी टेम्पो व ०४ दुचाकी वाहनासह एकुण रूपये १८,१३,११०/- रुपयाचा प्रोव्हि. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कालवधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण ०८ ढाब्यावर गुन्हे नोंदविण्यात आले असून ३२ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे. हॉटेल राजमुद्रा हॉटेल गोकुळ ढाबा, धनगर वाडा ढाबा, के के. के. मटण भाजनालय, हॉटेल अरहान अश्या ढाब्यावर कलम ६८ व ८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच अशाच प्रकारची धडक कारवाई या पुढेही चालू राहणार असुन आचारसंहिताच्या पार्श्वभुमीवर या विभागाकडुन विषेश पथके नेमण्यात आली आहेत.

























