सोलापूर : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अहिल्याबाई प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेत राणी श्रीमंडी हिने 63.00% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. शाहिस्ता झाकीर हुसेन हिने 62.17% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर पुनम सोलंकर हिने 57.00% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य इस्माईल शेख सर यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी प्रा. अनंत सुरते, प्रा. शितल राठोड, प्रा. महेंद्र ढवाण, प्रा. अर्चना दीक्षित, प्रा. धनाजी धेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच, यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकचे संस्थेचे संस्थापक-सचिव हाजी बंदेनवाज शेख यांनीही अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो : यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना प्राचार्य इस्माईल शेख उपस्थित प्राध्यापक वर्ग.

























