जेऊर – करमाळा तालुक्यातील विषमुक्त भाजीपाला पिकवणाऱ्या करमाळा ऑरगॅनिक ग्रुपच्या सोलापूर येथील सेंद्रिय आठवडा बाजाराचा पालकमंत्री व पोलीस अधीक्षकांच्या हस्ते शुभारंभ झाला.यावेळी त्यांनी ग्रुपच्या कार्याचे कौतुक करून शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
पाणी फाउंडेशन टीमच्या प्रेरणेतून करमाळा येथे सुरू झालेला करमाळा ऑरगॅनिक विषमुक्त आठवडी बाजार हा सोलापूर येथे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे सेंद्रिय आठवडा बाजार ला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे भरलेल्या विषमुक्त आठवडी बाजाराला भेट देत शेतकऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारून समाजाला निरोगी अन्न देण्याच्या या उपक्रमाला त्यांनी विशेष दाद दिली, तसेच शेतकऱ्यांना विषमुक्त चळवळ अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
आपल्या मेहनतीने आरोग्यदायी भविष्यासाठी उभा राहत असलेला हा उपक्रम खरंच प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सेंद्रिय भाजीपाल्यासाठी बाजारपेठ मिळवून देण्या साठी पुढील काळातही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी हिराजी राऊत, जिवन होगले, मेजर सुनील दौंडे, हर्षद शिंदे, विक्रम खरात, विजय आवताडे, अतुल राऊत, महेंद्र नाना देशमुख, धनाजी माने, गणेश धुमाळ, प्रताप पाटील, सोमनाथ सायकर करमाळा ऑरगॅनिक विषमुक्त आठवडी बाजार या गटाचे हे शेतकरी आपला विषमुक्त भाजीपाला घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित होते


























