Sunday, November 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘एम्स’चे तज्ज्ञ देणार प्राध्यापकांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसह जिल्हा आणि परिसरातील रुग्णांनाही होणार लाभ

तरुण भारतbyतरुण भारत
December 14, 2025
in marathwada
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धारशिव – नागपूर येथील एम्सचे तज्ञ आता दर पंधरा दिवसाला धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर घेणार आहे. त्याचबरोबर काही सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर दररोज एक तास त्यांचा अमूल्य वेळ रुग्ण उपचारासाठी देणार आहेत. एम्स आणि आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दोन्ही संस्थांमधील सामंजस्य कराराच्या मसुद्याला राज्य शासनानेही आता मंजुरी दिली आहे. एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन असावे यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात जगभरात ख्याती असलेल्या एम्स संस्थेस शुक्रवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट दिली. एम्स आणि धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यातील सामंजस्य कराराच्या अनुषंगाने त्यांनी आढावा घेतला. आणि दोन्ही संस्थांच्या परस्पर सहकार्याने भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर बैठकीत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. नागपूर येथील एम्सच्या सहकार्यातून धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत.

एम्सचे अनुभवी आणि नामवंत तज्ञ त्यासाठी आवर्जून सहभागी होत आहेत. आता यापुढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर पंधरा दिवसाला या तज्ञ डॉक्टरांकडून लेक्चर घेतले जाणार आहे. या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना एम्समधील तज्ञ डॉक्टरांकडून थेट मार्गदर्शन, अद्ययावत माहिती आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षण लाभणार आहे. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनाही एम्ससारख्या नामांकित संस्थेत कशाप्रकारे रुग्णसेवा आणि व्यवस्थापन चालते याचे व्यावहारिक प्रशिक्षणही आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर एम्समधील काही सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर दररोज त्यांचा एक तास अमूल्य वेळ रुग्ण उपचारासाठी देणार आहेत.

काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी या मान्यवर सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर मंडळींचे मोठे सहकार्य लाभणार आहे. जगभरात आज घडीला मोठ्या वेगात संशोधन सुरु आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभ रुग्ण तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यामुळे होणार आहे. त्यासाठी एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथील अभ्यासक्रम असायला हवा यासाठीही आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

एम्सचे सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर टेलिमेडिसिनच्या माध्यमातूनही आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संपर्कात असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आणि अद्यावत उपचार देण्यासाठी आपल्या डॉक्टर मंडळीला मोठे सहकार्य लाभणार आहे. काही गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यासाठी एम्सने अधिकृतपणे आपल्याला मान्यता दिली आहे.

आवश्यकतेनुसार काही रुग्णांना थेट नागपूर येथे नेऊन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. या सहकार्यामुळे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी एम्स संस्थेस भेट देऊन आढावा घेतला. तसेच भविष्यातील उपक्रमाबाबतही चर्चा केली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्रसिंह चौहान,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास उपस्थित होते.

सामंजस्य कराराच्या मसुद्याला शासन मान्यता : आमदार राणाजगजितसिंह पाटील 

धाराशिव जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे अद्ययावत शिक्षण मिळावे. यासाठी नागपूर येथील एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. त्याला जुलै महिन्यात महाराष्ट्र शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेबांनी सभागृहातच वरील माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांमधील सामंजस्य कराराचा फायदा थेट विद्यार्थ्यांसह धाराशिव जिल्हा आणि परिसरातील रुग्णांनाही होणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Views: 72
Previous Post

आपापसात वाद मिटविल्याने समाजात शांतता प्रस्थापित होते – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

Next Post

प्रताप क्रीडा मंडळाच्या समुहनृत्य स्पर्धेत कलाकारांचे दमदार सादरीकरण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

प्रताप क्रीडा मंडळाच्या समुहनृत्य स्पर्धेत कलाकारांचे दमदार सादरीकरण

ताज्या बातम्या

सूर, संगीत अन् आठवणींची मैफल; प्रिसिजन गप्पांचा दुसरा दिवस संस्मरणीय!

November 22, 2026
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

November 21, 2026
घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 21, 2026
कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

November 21, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

November 21, 2026

जि.प.च्या सर्व साधारण सभेत ३९.५६ कोटींच्या कामांना हिरवा कंदील!

November 21, 2026
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

November 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1551009

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!