कुर्डूवाडी – प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी ” बारामतीची कन्या ” असा उल्लेख काय केला आणी वृशाली गांधी रातोरात प्रशिध्दीच्या झोतात आल्या. अन कुर्डूवाडी नगरपालिकेच्या निवडणूकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणूकीत अतीशय शात, संय्यमी पण गणीमी काव्याने कसलाही राजकीय अनूभव नसलेल्या नवख्या वृशाली महेश गांधी यांनी पारंपारीक शिवसेसेनेचा अभेद्य बालेकील्ला म्हणून ओळखल्या जाणा-या प्रभाग आठ मधूून निवडणूक जिंकत बालेकील्ला उध्वस्त केला.शिवसेना जिल्हाध्यक्ष धनंजय डीकोळे यांच्यासाठी येथील निवडणूक प्रतीष्ठेची मानली जात होती. कुर्डूवाडीच्या विकासासाठी निधी खेचून आण्यासाठी याच बारामतीच्या कन्येला उपनगराध्यक्षपद मीळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपनगराध्यक्षपद जर मीळाले तर राष्टृवादी काँग्रेसकडून जैन समाजासाठी प्रथमच प्रतीनिधीत्व असेल.
अत्यंत चुरशीची कुर्डूवाडी नगरपालिका निवडणूक झाली.राष्टृवादी काँग्रेस व शिवसेना उबाटा यांच्यातच खरी लढत पाहायला मीळाली.दोन्ही पक्षाकडून प्रचार सभाही घेण्यात आल्या.प्रचारा दरम्यान राष्टृवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुर्डूवाडी नगरपालिकेच्या उमेद्वारांच्या प्रचार सभेसाठी आले होते.त्यावेळी त्यांनी वृशाली गांधी यांचे तोंडभरून कौतुक करत या व्यासपिठावर आमच्या बारामतीच्या कन्या प्रभाग आठ मधून उभा आहेत.त्यांना विचारा बारामतीचा विकास कसा आहे.स्वच्छतेला महत्व दीले जाते.त्याच पध्दतीने कुर्डूवाडीचा विकास करायचा असेल तर सर्व उमेद्वारांना निवडून द्यावे लागेल असे आवाहन केले होते.
21 डीसेंबर रोजी नगरपालिकेचा निकाल लागला आणी राष्टृवादी काँग्रेसचे तेरा नगरसेवक निवडून आले.त्यामध्ये वृशाली महेश गांधी या 251 मतांनी निवडून आल्यानंतर सोशल मिडीयावर बारामतीची कन्या असा उल्लेख केलेले व्हीडीओ क्लिप्स सोशल मिडीयावर व्हायरल झाले.कुर्डूवाडीच्या जनतेने स्वच्छ प्रतिमा असलेला,चारीत्र्यसंपन्न ,सामाजीक बांधिलकी जपणा-या ,उच्च शिक्षीत अशा महेश गांधी यांच्या पत्नीस निवडून देवून उपमुख्यमंत्र्यांच्या तसेस माजी आ.संजयमामा शिंदे यांच्या आवाहनाला प्रतीसाद दीला.शिंदे घराण्याचे अत्यंत विस्वासू व निकटवर्तीय असल्यामुळे महेश गांधी यांनी राजकारणातले बारकावे कसे असतात याचा मात्र दांडगा अभ्यास होता.
शिंदे घराण्यावर तसेच मागील तीस वर्षापासुन असलेली निष्ठा कामी आली असून वृशाली गांधी या नगरसेवक झाल्या.आता त्यांच्यावर संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी मिळवून बारामतीसारखा विकास फक्त स्वताच्या प्रभागाचा नव्हे तर संपुर्ण कुर्डूवाडी शहराचा विकास करण्याची जबाबदारी आहे.यांंची उपनगराध्यक्ष म्हणून निवड होणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

















