
सोलापूर – देवासाठी केलेली भक्ती निष्काम असते. निष्काम भक्तीमध्येच शक्ती आणि सामर्थ्य आहे. भक्तीमुळे देवाला ऋणी करता येते. देव हळू -हळू भक्ताच्या ऋणामधून मुक्त होतो.देव भक्ताच्या आतला भाव पाहतो, बाह्य भाव पाहत नाही.
भक्ती करताना भक्ताने देवाला जीव, भाव अर्पण करावा लागतो .भक्ती करताना भक्ताने देवाला सर्व द्यावे लागते.देवाकडून काहीतरी मिळविण्यासाठी आपण भक्ती करतो.त्यामुळे भक्तीच्या बदल्यात देवाकडे काही मागणे म्हणजे निव्वळ व्यापार आहे,असे विचार देहूकर फड परंपरेचे व जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज ह.भ.प.कान्होबा महाराज देहूकर यांनी व्यक्त केले .ह.भ.प.माऊली महाराज बचुटे – सवाळकर शिष्य-मित्र परिवाराच्यावतीने दमाणी नगरातील गड दर्शन समाज मंदिरात
सुरु असलेल्या पंचदिनी किर्तन महोत्सवाची सांगता,रविवारी दुपारी कान्होबा महाराज देहूकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली .हरिनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता.गोपाळकाला गोड झाला,असे म्हणत काल्याचा प्रसाद व महाप्रसाद घेऊन भाविक तृप्त झाले.
परमार्थाचे मुखाने चिंतन करावे आणि हृदयात ज्ञान घ्यावे. निष्काम आणि सकाम हे भक्ती करणारे दोन वर्ग आहेत. सकाम भक्ताची भक्ती देवाकडून काही तरी मिळविण्यासाठी आणि निष्काम भक्ताची भक्ती देवाला सगळं देण्यासाठी असते. देवाकडून सुख मिळावे यासाठी जाणारा सकाम वर्ग आहे. परमार्थात धैर्य लागतं.परमार्थात मुखी नाम आणि हृदयी ज्ञान हेच दोन महत्वाचे नाम आहेत.परमार्थ पुष्कळ झाला ,मात्र भाव कमी झाला आणि भाव खाणारे जास्त झाले,असे सांगत संत तुकाराम महाराजांनी आपल्याला संसारामध्ये राहूनही परमार्थ करणे शक्य असल्याचा मार्ग दाखवून दिला आहे,असे कान्होबा महाराज यांनी सांगितले .
संसारात सुख दुःख हे येतच राहते. त्यातूनही विरक्त होऊन भगवंताच्या नामात तल्लीन होणे हेच मानवी जीवनाचे सार्थक आहे. आजच्या युगात माणसाला बाह्य सुखाची हाव लागले आहे .परंतु खरी शांती केवळ भक्तीतच आहे .त्यामुळे नित्यनेमाने विठ्ठल नामाचा गजर करावा आणि आपल्या जीवनाचे सार्थक करावे असे आवाहन ,कान्होबा महाराजांनी यावेळी बोलताना केले. भक्ती ,ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम महाराजांच्या कीर्तनामधून ऐकायला मिळाला.तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत कान्होबा महाराज म्हणाले ,संतांनी नेहमी समाज कल्याण आणि मानवतेचा संदेश दिला आहे. अंत;करण शुद्ध असणे परमेश्वराला जास्त प्रिय आहे .कुटुंब व्यवस्था एकमेकांबद्दलचा आदर आणि सामाजिक सलोखा टिकून ठेवण्यावर त्यांनी आपल्या कीर्तनात भर दिला .सर्वांनी संतांच्या शिकवणीनुसार साधे सरळ आणि निस्वार्थी जीवन जगावे असा सल्लाही त्यांनी दिला.
भौतिक सुखाच्या मागे न धावता भगवंताच्या चरणी लीन होऊन मिळणारे समाधानच खरे सुख आहे .खरी शांती आणि समाधान हे केवळ आणि केवळ विठ्ठलाच्या नामातच आहे . संतांचे जीवन हे समाजाच्या उद्धाराचे असते ,असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे . संतांच्या वचनांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या शिकवणीनुसारच आचरण करा .भगवंताच्या नामासाठीच आपली वाणी वापरा .मुखात विठ्ठलाचे नाव असेल तर जीवनातील सर्व दुःख दूर होतात . संतांनी नेहमी समाज कल्याण आणि मानवतेचा संदेश दिला आहे. अंत;करण शुद्ध असणे परमेश्वराला जास्त प्रिय आहे .कान्होबा महाराज यांनी केले.
Post Views: 12