सोलापूर : गल्लीमध्ये थांबलेल्या तरुणाच्या पायाजवळ थुंकल्याचा जाब विचारल्याने झालेल्या बेदम मारहाणीत दोघे तरुण जखमी झाले . याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शंकर, शुभम, राज आणि विकी बुऱ्हानपूरे ( सर्व रा . लोधी गल्ली सोलापूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत रोहित चरणसिंग मन्सावाले (वय २८, रा. लोधी गल्ली) यांनी फिर्याद दिली आहे .
३ जून रोजी सकाळी बेडरपूल लोधी गल्ली भागात यातील फिर्यादी रोहित .चा भाऊ शुभम याच्या पायाजवळ आरोपी यांनी थुंकल्याने वाद झाला. आरोपींनी “तेरे आंग पे उडा क्या रे” म्हणत मारहाण सुरू केली. भांडण सोडवण्यासाठी रोहित गेला असता आरोपी शंकर बुऱ्हानपुरे याने लोखंडी सळई आणून शुभमच्या डोक्यात व पाठीवर मारली, तर विकीने हातातील कड्याने तोंडावर मारून गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार गडेराव हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 6