स्थायी समितीची सभा; विकासकामांचा आढावा, जमा-खर्च पत्रकांचे अवलोकन

सोलापूर – जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद मुख्यालयातील शिवरत्न सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष तथा सभापती दिपक अरुण वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे.
            स्थायी समितीच्या सदस्यांना सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून सर्व खातेप्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांनाही आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक विभागाने आपल्या अखत्यारितील विकासकामांची संक्षिप्त टिपणी सभेपूर्वी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सभेच्या कामकाजामध्ये दिनांक ८ मे २०२६ रोजी झालेल्या स्थायी समिती सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करणे, शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण शासन निर्णय व परिपत्रकांची नोंद घेणे तसेच विविध विभागांकडील विकासकामांचा सविस्तर आढावा घेणे या प्रमुख विषयांचा समावेश आहे.
         याशिवाय जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जमा-खर्च पत्रकांचे अवलोकन करून त्यास मंजुरी देण्याबाबत विचारविनिमय होणार आहे. जिल्हा ग्रामविकास निधीच्या खर्च व उपलब्धतेबाबत माहिती घेऊन आवश्यक मंजुरी देण्याचाही विषय सभेपुढे ठेवण्यात आला आहे. विविध विषय समित्यांच्या मे २०२६ महिन्यात झालेल्या सभांच्या कार्यवृत्तांची नोंद घेण्याचे कामही यावेळी करण्यात येणार आहे.
           स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषदेच्या विकास योजनांची अंमलबजावणी, आर्थिक स्थिती आणि विविध विभागांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार असल्याने या सभेकडे जिल्हा परिषद प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे. सभापतींच्या परवानगीने आयत्या वेळचे विषयही चर्चेसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Next Post

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!