बार्शी – दि. १२ ऑगस्ट २६ रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास सुभाषनगर परिसरातील हिरेमठ हॉस्पिटलजवळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते, त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल, धारदार चाकू, लोखंडी तलवार आणि स्विफ्ट डिझायर कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ६१२/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियमातील कलम 3, 4, 25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 3(5) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या नोंदीनुसार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, सोलापूर यांच्या आदेशान्वये ५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 37 (1) (3) अन्वये शस्त्र बाळगण्यासंदर्भात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून संबंधितांकडे विनापरवाना शस्त्रे आढळून आल्याचा पोलिसांचा आरोप होता.
सदर प्रकरणात पोलिसांनी आरोपीस अटक केल्यानंतर आरोपी नंबर २ व ३ यांचा जामीन अर्ज ॲड. अनिकेत सहदेव गुंड यांचेमार्फत न्यायालयासमोर दाखल करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे, प्रकरणातील कागदपत्रे व उपलब्ध परिस्थितीचा विचार करुन तसेच आरोपीविरुद्ध सबळ पुराव्याच्या अभाव असल्याबाबत युक्तिवाद ॲड. अनिकेत गुंड यांनी केला. सदर प्रकरणातील आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन सदर आरोपीची जामीनावर मुक्तता करण्यात आली.
सदर प्रकरणी यात आरोपीच्या वतीने ॲड. अनिकेत सहदेव गुंड यांनी काम पाहिले.
Post Views: 4