बार्शी – राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु असताना बार्शी तालुक्याकडे मात्र पावसाने अद्यापही पाठ फिरवली आहे. जुलै महिन्याचे दहा दिवस उलटूनही तालुक्यात केवळ २७.५ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी अद्यापही मोठ्या प्रमाणावर सुरु होऊ शकलेली नाही.
यापूर्वी जूनअखेर बार्शी तालुक्यात सुमारे ८२.५ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत केवळ २७.५ मिमी पाऊस झाल्याने एकूण पर्जन्यमान सुमारे ११० मिमीच्या आसपास पोहोचले आहे. मात्र, पेरणीसाठी आवश्यक सलग आणि दमदार पाऊस अद्याप झालेला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.
बार्शी तालुक्यातील अनेक भागांत रिमझिम किंवा तुरळक सरी पडत आहेत. काही मंडळांमध्ये तुलनेने अधिक पाऊस झाला असला तरी तालुक्याची सरासरी केवळ २७.५ मिमी असल्याने शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झालेला नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु असताना सोलापूर जिल्हा आणि विशेषतः बार्शी तालुका अजूनही सरासरी ५.६ मिमी पावसाची नोंद गुरुवार, दि. ९ जुलैच्या सकाळीपर्यंतच्या अधिकृत पर्जन्यमान अहवालानुसार बार्शी तालुक्यात सरासरी ५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जुलै १ ते ९ या कालावधीतील एकूण पाऊस २७.५ मिमी झाला आहे.
समाधानकारक पावसापासून वंचित आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
Post Views: 15