धाराशिव – वैराग नाका येथील फकिरा नगर परिसरातील युवकांनी सामाजिक बांधिलकी आणि महापुरुषांविषयीचा आदर जपत क्रांतिवीर फकिरा चौकाचे आकर्षक सुशोभीकरण करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. सर्व समाज बांधवांच्या सहभागातून आणि स्वखर्चातून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
क्रांतिवीर फकिरा राणोजी साठे यांनी इंग्रजी सत्तेविरोधात संघर्ष करत अन्यायाविरुद्ध लढा उभारला होता. दुष्काळाच्या काळात उपाशी जनतेसाठी आधार बनलेल्या या महान योद्ध्याच्या नावाने असलेल्या चौकाच्या सुशोभीकरणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. ही बाब लक्षात घेऊन परिसरातील युवकांनी एकत्र येत पुढाकार घेत चौकाचे नूतनीकरण केले तसेच “क्रांतिवीर फकिरा चौक” असा डिजिटल बोर्डही बसविण्यात आला.
या सामाजिक उपक्रमात मेजर कृष्णा पेठे, वैभव पवार, किरण ऐडके, ऋतिक क्षिरसागर, ऋतिक पेठे, अमर गायकवाड, सुनिल पेठे, विजय देवकुळे, अंकित डोंगरे, राहुल ऐडके, अभिजीत काळुंके, भैय्या पेठे, विष्णु पेठे, किशोर नागटिळक, अभिषेक बाबर, सार्थक क्षिरसागर, योगेश पेठे, शांतनु ऐडके, राजू पेठे, आदित्य बागडे, चेतन पेठे, मयूर डोंगरे, अमित जाधव, रतन पेठे, शिव पेठे, आशिष ऐडके, सुनिल थोरात आदींसह अनेक समाज बांधवांनी योगदान दिले.
सुशोभीकरण केलेल्या चौकाचे उद्घाटन माजी नगरसेवक दत्ता पेठे, अशोक पेठे, अहमद भाई कुरेशी, रॉबिन बगाडे, सुमेध क्षिरसागर, बाळासाहेब कांबळे, अंकुश पेठे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. उद्घाटनानंतर फटाक्यांची आतषबाजी, डीजेवर महापुरुषांची गीते आणि जल्लोषपूर्ण वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या उपक्रमामुळे परिसरातील युवकांनी केवळ चौकाचे सुशोभीकरण केले नाही, तर महापुरुषांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्यही केले आहे. युवकांच्या या सामाजिक जाणीव आणि एकजुटीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

























