Thursday, July 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आयत्या विषयातून ११ कोटींच्या औषध खरेदीला ग्रीन सिग्नल !

तरुण भारतbyतरुण भारत
May 16, 2026
in editor
0
आयत्या विषयातून ११ कोटींच्या औषध खरेदीला ग्रीन सिग्नल !
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत आषाढी वारीसाठी तब्बल ११ कोटी रुपयांच्या औषध खरेदीला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे हा विषय मूळ अजेंड्यावर नसतानाही ऐनवेळी ‘आयत्या वेळेचा विषय’ म्हणून सभेत मांडण्यात आला आणि त्यास एकमताने मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून १ कोटी रुपये, तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

     आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही आरोग्य विभागाकडून औषध खरेदीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नव्हती. हा विषय मूळ अजेंड्यावर नसल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी तातडीने विषय सभेत आणून मंजुरी घेतल्याची चर्चा सभागृहात रंगली.

     जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात सभा पार पडली. जवळपास तीन तास चाललेल्या या सभेत शिक्षण, आरोग्य, शेती, पशुसंवर्धन, डीपी-ट्रान्सफॉर्मर, शिक्षकांची कमतरता, जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली; मात्र अनेक मुद्द्यांवर ठोस निर्णय न झाल्याने सदस्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले.

      विरोधी पक्षनेते नसल्याने चर्चेदरम्यान अनेक विषय भरकटल्याचे चित्र दिसून आले. अखेर सभागृह नेत्या रश्मी बागल यांनी हस्तक्षेप करून चर्चा आटोपती घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पुढील सभेत सविस्तर चर्चा करण्याचे आणि आठ दिवस आधी लेखी माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सभा संपविण्यात आली.

      सभेमध्ये बोरामणी गटाचे सदस्य नेताजी खंडागळे यांनी जिल्हा परिषद आवारातील जागेवर व्यापारी संकुल उभारून उत्पन्न वाढविण्याचा प्रस्ताव मांडला. माढा तालुक्यातील सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी माढा चौकात व्यावसायिक गाळे उभारण्याची सूचना केली. माथाडी प्रतिनिधी अतुल पवार यांनी “गाळे उभारणे शक्य नसेल तर जागा भाडेतत्त्वावर द्यावी,” अशी भूमिका मांडली.

       सभेच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय तथा सांगोल्यातील देशमुख यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच ज्योती वाघमारे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. जिल्हा परिषदेला पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल कुलदीप जंगम यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरणे, शाळांमध्ये शिपाई नेमणे, प्रत्येक तालुक्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करणे, नेहरू वस्ती योजनेतील स्वच्छता, तसेच पंढरपूर येथील बंद वसतिगृह पुन्हा सुरू करण्याची मागणी यांसारखे विषयही चर्चेत आले. दुरुस्तीअभावी आणि कमी प्रवेशसंख्येमुळे वसतिगृह बंद असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

     बोरामणी गटातील अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याचा मुद्दा नेताजी खंडागळे यांनी उपस्थित केला. मित्रपक्ष सदस्यांनी “सोबत असूनही सन्मानाची वागणूक मिळत नाही,” अशी नाराजी व्यक्त करत समिती नियुक्त्यांमध्ये विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला. त्यावर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी कोणालाही नाराज केले जाणार नसल्याचे सांगत सदस्यांची समजूत काढली.

      आषाढी वारी नियोजनाबाबत सभागृह नेत्या रश्मी बागल यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी जर्मन हँगर, पाणीपुरवठा, शौचालये, मोबाईल ट्रॉली यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले. शेगावहून येणाऱ्या गजानन महाराज पालखीच्या स्वागतासाठी ऊळेगाव येथे आवश्यक सुविधा द्याव्यात, अशी मागणीही सदस्यांनी केली.

       या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहीणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, प्रशासकीय अधिकारी स्मिता पाटील, वित्त व लेख अधिकारी मिनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य व अधिकारी उपस्थित होते. सभेचे कामकाज उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी पाहिले.

कोट

जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला चालना देतानाच सामाजिक बांधिलकी जपणारे निर्णय

सभेमध्ये शेतकरी, पशुपालक, महिला, दिव्यांग बांधव, विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या योजनांवर विशेष भर देण्यात आला. पशुसंवर्धन विभागाच्या विविध उपक्रमांसह कुक्कुट विकास योजना, दिव्यांगांसाठी शेळीगट व ई-बाईक योजना, अंगणवाडी सक्षमीकरण, ग्रामीण रस्ते व पूल विकास अशा विविध विषयांना सभागृहाने मंजुरी दिली. जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला चालना देतानाच सामाजिक बांधिलकी जपणारे निर्णय या सभेत घेण्यात आल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले. विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.

– दीपक वैद्य, अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर 

कोट

जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढी संदर्भात चर्चा

सोलापूर जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करून अनेक जनहिताचे ठराव मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढी संदर्भात चर्चा करण्यात आली. सभेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली. यापुढील सभेसाठी सदस्यांनी आपले विषय सभेच्या पूर्वी कळवावेत, असे आवाहन करण्यात आले.

– इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर 

चौकट 

जिल्हा परिषदेच्या सभेत पशुसंवर्धन सदस्यांच्या फैलावर ; चरणराज चवरेंनी दिला शिवसेना स्टाईल इशारा

सोलापूर जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सभेत पशुसंवर्धन विभाग सदस्यांच्या फैलावर दिसून आला. पशुसंवर्धन विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता, दवाखान्यात नसलेल्या सोई सुविधा, ॲम्ब्युलन्स नसल्याने सदस्यांनी अधिकारी येवले यांना चांगलेच झापले. पेनुर जिल्हा परिषद गटाचे शिवसेना सदस्य चरणराज चवरे यांनी गाड्यांची संख्या विचारली तेव्हा अधिकाऱ्यांना सांगता आले नाही, तेव्हा सभागृहात ६६ सदस्य हे नवीन आहेत जर तुम्हालाच माहिती नाही आम्हाला कसे कळणार, ही पहिली सभा ठीक आहे पण पुढील सभेला माहिती ठेवा, असा हलगर्जीपणा आम्ही पुढे खपवून घेणार नाही असा आपल्या स्टाईलने दम भरला. माढा तालुक्यातील भाजप सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी पशुसंवर्धन च्या दवाखान्यात कर्मचारी नेमणूक करण्याची मागणी केली.

चौकट

झेडपी शाळांना सुट्टी, मग अंगणवाड्यांना का नाही?

उन्हाळ्यात जिल्हा परिषद शाळांना सुट्टी दिली जाते; मात्र लहान मुलांच्या अंगणवाड्या सुरू ठेवण्यात येतात. वाढत्या तापमानाचा बालकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने अंगणवाड्यांनाही महिनाभर सुट्टी द्यावी आणि त्या काळातील आहार घरपोच उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सांगोला तालुक्यातील सदस्य लवटे यांनी सभेत केली.

चौकट 

झेडपी प्रवेशद्वारासमोरील आंदोलने थांबवा

राज्य व केंद्र शासनाच्या विविध प्रश्नांवर जिल्हा परिषदेसमोर आंदोलने केली जात असल्याने वाहतूक आणि प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होतात. आंदोलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात यावीत, अशी मागणी सदस्य पृथ्वीराज माने यांनी केली.

चौकट

सर्वसाधारण सभेला वरिष्ठ अधिकारी हजर राहावेत.

जिल्हास्तरीय अधिकारी सभेला स्वतः उपस्थित न राहता प्रतिनिधींना पाठवतात. त्यामुळे सदस्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली. महावितरणच्या प्रश्नांवर वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित असल्याने नेताजी खंडागळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

चौकट 

डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतराचा ठराव

उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.

चौकट 

 पहिल्याच सभेत प्रश्नांची सरबत्ती; अधिकारी मात्र निर्धास्त”

जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले; मात्र त्यावर सखोल चर्चा न झाल्याने अधिकारीच पदाधिकाऱ्यांवर भारी पडल्याची चर्चा सभागृहात रंगली.

Post Views: 28
Previous Post

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सिद्धेश्वर गाडे यांचे निवेदन 

Next Post

क्रांतिवीर फकिरा चौकाचे समाजसेवक दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत सुशोभीकरण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
क्रांतिवीर फकिरा चौकाचे समाजसेवक दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत सुशोभीकरण

क्रांतिवीर फकिरा चौकाचे समाजसेवक दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत सुशोभीकरण

ताज्या बातम्या

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

July 1, 2026
सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

July 1, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 1, 2026

वालचंद’चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

July 1, 2026
“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

July 1, 2026
डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

July 1, 2026
पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026

महापालिका भंगार चोरी प्रकरणात मोठी कारवाई

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0952339

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697