बँकेत व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तुमचे जर पंजाब नॅशनल बँकेत (PNB) खाते असेल तर तुम्हाला सावध व्हावं लागेल. कारण पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे.
गेल्या तीन वर्षात कोणत्याही प्रकारचे व्यवहार झाले नसलेली आणि शून्य शिल्लक असलेली बँक खाती एका महिन्यानंतर बंद करण्यात येणार आहेत. ज्या खात्यावरुन कोणत्याही प्रकारचे व्यवहार होत नाहीत, ती खाती बंद केली जाणार आहेत.
खात्यांचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान खात्यांची गणना 30 एप्रिल 2024 च्या आधारावर केली जाणार आहे. तसेच बँक डिमॅट खाती बंद करण्यात येणार नाहीत. त्यामुळे हे नियम डिमॅट खात्यांसाठी लागू होणार नाहीत.