सोलापूर – बहिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेल्या एका भावाला लाथाबुक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना माढा तालुक्यातील बारलोणी येथे घडली .
अण्णा राजाराम वाघमारे (वय 40 वर्ष , रा . गुरसाळे , ता पंढरपूर) असे मारहाण झालेल्या त्या भावाचे नाव असून तो मंगळवारी सायंकाळी कुर्डूवाडी येथील बारलोणी येथे बहिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला असता तुम्ही इथे का आलात असे म्हणून त्याला हणमंतू नवले , सिद्धेश्वर नवले यांनी मिळून लाथा बुक्याने मारहाण केली . यात डोळ्या जवळ जखम व सर्व अंगाला मुका मार लागल्याने कुर्डूवाडी येथील आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात तो स्वतः आज सकाळी दाखल झाला .
Post Views: 12